Pune District : राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये समर्थची सिद्धी राज्यात तिसरी

बेल्हे : समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे (ता. जुन्नर) या औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्षामध्ये शिकत असलेली सिद्धी चौरे हिने एड्स जागरुकता प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक संपादन केल्याची माहिती समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके यांनी दिली.
1 डिसेंबर जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी एचआयव्ही आणि एड्सबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि एड्सची महामारी संपवण्यासाठी जनजागृती केली जाते. याच जनजागृतीसाठी सोसायटी ऑफ क्लिनिकल रिसर्च अँड मेडिकल प्रोफेशनल्स (एससीआरएमपी) महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रव्यापी एड्स जागरुकता प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने असल्याकारणाने राज्यातून सुमारे 500 विद्यार्थ्यांनी विविध शाखांतून आपला सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत अंतिम वर्ष बी.फार्मसी मध्ये शिकत असलेल्या सिद्धी चौरे हिने 100 पैकी 93 गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकविला. यानिमित्ताने एड्स बद्दलचे समज,गैरसमज आणि वास्तविकता या विषयावर समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटलचे डॉ.रमेश पाडेकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ.राजेंद्र निचित यांनी एड्सपासून बचाव करण्यासाठी घ्यायची खबरदारी या विषयावर मार्गदर्शन केले.
संस्थेच्या वतीने सिद्धी चौरे हिचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, प्राचार्य डॉ. संतोष घुले आदी उपस्थित होते.
फोटो : सिद्धी चौरे





