सिद्धार्थने शेअर केला मितालीचा मजेशीर व्हिडीओ; म्हणाला ‘धसमुसळी बायको’

मुंबई – अभिनेता सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि अभिनेत्री मिताली मयेकर (Mithali Mayekar) हे जोडपे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा हे दोघे परदेशात फिरायला जाताना दिसतात. येथील अनेक फोटो ते सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकतेच सिद्धार्थने मितालीचा एक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा त्याने साऱ्यांचे लजस वेधून घेतले आहे.
इनस्टाग्राम अकाऊंटवर सिद्धार्थने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मिताली वाळवंटात चालताना दिसत आहे. मात्र चालत असताना तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. यानंतर ते दोघंही जोरात हसू लागतात. ‘Perks of getting to shoot for the धसमुसळी बायको! Very glamorous’, असं मजेशीर कॅप्शन सिद्धार्थन या व्हिडीओला दिले आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ चाहत्यांच्याही पसंतीस पडत असून यावर लाइक आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, सिद्धार्थ आणि मितालीचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चर्चेत राहिले आहेत. काही दिवसांपूर्वी हे दोघे पॅरिसला गेले होते. येथील रोमॅंटिक अंदाजातील त्यांचे फोटो देखील अनेकांच्या पसंतीस पडले होते. पॅरिसमधील आयफेल टॉवर समोर उभं राहून त्यांनी फोटोशूट केले होते. मितालीने वेस्टर्न ड्रेस परिधान करत फोटोशूट केले होते. तर सिद्धार्थने यावेळी ब्लेजर परिधान केलं होतं. दरम्यान, सिद्धार्थ चांदेकरचा ‘झिम्मा 2’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.





