सिद्धार्थ मल्होत्राच्या नव्या सिनेमाची घोषणा; रिलीज डेट जाहीर

Siddharth Malhotra | अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. स्टूडंट ऑफ द इयर, शेरशाह, योद्धा यासारखे त्याचे चित्रपट सुपरहिट ठरले. आता त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक पाटी दिसते. त्यावर “सूर्यास्तानंतर प्रवेश वर्जित” असे लिहिलेले दिसते. पुढे हातात मशाल आणि लुंगी परिधान करुन एक व्यक्ती संपूर्ण जंगलात फेरफटका मारत असलेला दिसतो. त्याच्या मशालीच्या प्रकाशाने संपूर्ण जंगल उजळून निघतं. याशिवाय जंगलात एक भव्य मंदिर दिसतं. शेवटी जंगलातील गर्द झाडीत दोन डोळे प्रकट होतात. अशाप्रकारे रहस्यमयी थ्रिलर कथानक असलेल्या VVAN सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. Siddharth Malhotra |
View this post on Instagram
बालाजी टेलिफिल्म्स आणि TVF ने सिद्धार्थ मल्होत्रासोबत त्यांचा पहिला प्रोजेक्ट VVAN लाँच केला आहे. या मालिकेचे दिग्दर्शन दीपक मिश्रा करणार आहेत, ज्यांनी यापूर्वी ‘पंचायत’ हा प्रसिद्ध शो दिग्दर्शित केला होता. पंचायत, कोटा फॅक्टरी अशा वेबसीरिज करुन लोकांच्या पसंतीस आलेली कंपनी TVF ने या सिनेमाची निर्मिती केली आहे.
सोबत एकता कपूर आणि शोभा कपूर या सिनेमाच्या सहनिर्माती आहेत. ओटीटी विश्वात स्वतःचा दबदबा निर्माण करणारी TVF या प्रॉडक्शन कंपनीचा हा पहिला सिनेमा असणार आहे, जो थिएटरमध्ये 2025 ला छठ पूजेच्या मुहुर्तावर सिनेमागृहांत रिलीज होईल.
दरम्यान, बालाजी मोशन पिक्चर्स, बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचा एक भाग, नेहमीच बोल्ड, रोमांचक आणि थरारक सामग्री तयार करण्यासाठी ओळखले जाते जे लोकांना कनेक्ट ठेवते. दुसरीकडे, TVF ने अशा कथा सांगून मने जिंकली आहेत ज्यांच्याशी लोक सहजपणे कनेक्ट होऊ शकतात. दोघांच्या एकत्र येण्याने, VVAN एक अनोखा सिनेमॅटिक अनुभव देण्याची आशा आहे.
हेही वाचा:
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम 370 वरुन पुन्हा एकदा गदारोळ; आमदार एकमेकांविरोधात भिडले





