Singham Again | Shweta Tiwari : बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘सिंघम’ चित्रपट सुपरहिट ठरला होता. या सिनेमाच्या दोन्ही भागाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता दिग्दर्शक रोहित शेट्टी या सिनेमाचा तिसरा भाग घेऊन येणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिंघम अगेन’असे आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे. हा सिनेमा 15 ऑगस्ट 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. ‘सिंघम’, ‘सिंघम रिटर्न्स’, सिम्बा’ या सारखे चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मात्र, आता लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीचा बहुचर्चित ‘सिंघम अगेन’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात बाजीराव सिंघम अर्थात अजय देवगनसह सिम्बा लूकमध्ये रणवीर सिंह दिसणार आहे. या सिनेमात टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या कलाकारांचाही अॅक्शन मोड पाहायला मिळणार आहे. तर आता आणखी एक नाव या चित्रपटाशी जोडलं गेलं आहे. नेहमीच आपल्या फिटनेस मुळे चर्चेत असणारी अभिनेत्री ‘श्वेता तिवारी’ या सिनेमात झळकणार आहे. स्वतः अभिनेत्रीने याबद्दल खुलासा केला आहे. त्यामुळे आता श्वेता तिवारी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आग लावण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने श्वेता तिवारीने एका मुलाखतीत तिच्या आजवरच्या प्रवासावर आणि संघर्षावर भाष्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली की, “सिंघम अगेन चित्रपटामध्ये मी अजय देवगण सरांसोबत इंटेलिजन्स ऑफिसरची भूमिका साकारत आहे. हा माझ्यासाठी खूप चांगला अनुभव होता. मी शूटिंग पूर्ण केलं आहे. रोहित शेट्टी सरांसोबत काम करणं खूप मोठी गोष्ट आहे, ते खूप टॅलेंटेड आहेत आणि त्यांना माहित आहे, त्यांना नेमकं काय हवंय. ही माझ्यासाठी खूप मोठी संधी होती.’ असं श्वेता तिवारी म्हणाली. अभिनेत्री श्वेता तिवारीला परिचयाची गरज नाही. ‘कसौटी जिंदगी के’ मधील प्रेरणा ही व्यक्तिरेखा साकारून तिने घराघरात आपले नाव कमावले. ‘मैं हूं अपराजिता’ने तिने रातोरात प्रसिद्धी मिळवली. श्वेताने सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ जिंकला. ती नेहमीच तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते, अशात आता श्वेता सिंघम अगेन चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.