शूरा प्रेग्नंट, अरबाज खान दुसऱ्यांदा होणार बाबा? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Arbaaz Khan And Sshura Khan | अभिनेता आणि निर्माता अरबाज खान वैयक्तिक कारणामुळे नेहमीच चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी ईद पार्टीमध्ये अरबाज आणि त्याची पत्नी शूरा स्पॉट झाले होते. त्यादरम्यान शूर प्रेग्नंट असल्याच्या चर्चा रंगूल्या होत्या. तिचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
त्यानंतर अरबाज खानला अलीकडेच त्याची पत्नी शूरा खानसोबत एका गायनॅक्लॉजिस्टच्या क्लिनिकबाहेर पाहिलं गेलं. शूरा आणि अरबाजचा हाच व्हिडीओ पिंकव्हिलाच्या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये शूरा खान प्रेग्नंट असल्याचा दावा करण्यात आला आहे.
पिंकव्हिलाच्या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये अरबाज आणि शूरा मुंबईतील एका रुग्णालयाबाहेर दिसत आहेत. शूराने घातलेला पांढऱ्या रंगाचा लांब शर्ट आणि तिचा स्पष्ट दिसणारा बेबी बंप यामुळे तिच्या प्रेग्नंसीची चर्चा सुरू झाली आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये अरबाजही तिच्यासोबत दिसत आहे. Arbaaz Khan And Shura Khan |
View this post on Instagram
हा व्हिडिओ समोर आल्यापासून सोशल मीडियावर चाहत्यांनी अरबाज आणि शूराला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. पण दोघांनीही याबद्दल स्पष्टपणे कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. Arbaaz Khan And Shura Khan |
यापूर्वी अरबाज खानचं लग्न अभिनेत्री मलायका अरोराशी झालं होतं, मात्र त्यांचा घटस्फोट झाला. त्यांना अरहान खान नावाचा एक मुलगा आहे. त्यानंतर वयाच्या 55 व्या वर्षी, अरबाज खाननं डिसेंबर 2023 मध्ये सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट शुरा खानशी दुसरं लग्न केलं. आता तो दुसऱ्यांदा वडील होणार आहे. Arbaaz Khan And Shura Khan |
हेही वाचा:
नाशिकमध्ये तणाव ! अनधिकृत दर्गा हटवण्याआधीच पसरली अफवा; मध्यरात्री पोलिसांवर दगडफेक





