Gill Unwanted Record : ३९ वर्षांत पहिल्यांदाच घडलं! दिनुषाने फिरवलं भारताच्या मनसुब्यांवर पाणी; कर्णधार गिलच्या नावावर नकोसा विक्रम
Gill Unwanted Record : श्रीलंकेवर फॉलोऑन लादल्यानंतरही सामना अनिर्णित राहिल्याने कर्णधार शुबमन गिलच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

Shubman Gill Unwanted Captaincy IND vs SL Colombo Test Drawn After Enforcing Follow On : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात बहुतांश काळ आघाडीवर राहूनही भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही. पहिल्या डावात २१३ धावांची भक्कम आघाडी घेत श्रीलंकेवर फॉलोऑन लादल्यानंतरही सामना अनिर्णित राहिल्याने भारतीय कर्णधार शुबमन गिलच्या (Shubman Gill) नावावर एका नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेविरुद्ध फॉलोऑन दिल्यानंतर सामना जिंकण्यात अपयशी ठरणारा गिल हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.
३९ वर्षांची विजयाची मालिका खंडित; कपिल देव ते रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला –
गेल्या ३९ वर्षांत भारतीय कर्णधारांनी श्रीलंकेविरुद्ध जेव्हा जेव्हा फॉलोऑन लादला, तेव्हा भारताने प्रत्येक वेळी विजय साकारला होता. १९८७ मध्ये कपिल देव, १९९० आणि १९९४ मध्ये मोहम्मद अझरुद्दीन, २००९ मध्ये महेंद्रसिंह धोनी, २०१७ मध्ये विराट कोहली आणि २०२२ मध्ये रोहित शर्मा यांनी फॉलोऑन लादून सामने खिशात घातले होते. मात्र, २०२६ च्या कोलंबो कसोटीत गिलच्या नेतृत्वाखाली हा सलग विजयांची ऐतिहासिक मालिका अखेर खंडित झाली.
सोनल दिनुषा ठरला अडथळा; हातातून निसटला ऐतिहासिक विजय –
Sri Lanka’s resilience with the bat ensures that only three wickets fall on the final day. The two teams shake hands after a hard-fought Test, which ends in a draw.#TeamIndia win the series 1-0.
Details – https://t.co/Uh4Xgn8rB5 pic.twitter.com/spxoqmBzct
— BCCI (@BCCI) August 27, 2026
भारताने पहिला डाव ९ बाद ५०३ धावांवर घोषित केल्यानंतर श्रीलंकेचा पहिला डाव २९० धावांवर आटोपला होता. फॉलोऑन मिळाल्यानंतर चौथ्या दिवसअखेर लंकेचे ६ फलंदाज अवघ्या २२९ धावांवर गारद झाले होते आणि भारताचा विजय निश्चित मानला जात होता. परंतु, पाचव्या दिवशी श्रीलंकेचा फलंदाज सोनल दिनुषाने नाबाद १३३ धावांची मॅरेथॉन शतकी खेळी करत भारताच्या तोंडचा घास हिरावला. श्रीलंकेने दुसऱ्या डावात ९ बाद ४२९ धावांवर डाव घोषित करून सामना अनिर्णित राखला.
श्रीलंकेने १६ वर्षांनंतर घडवला चमत्कार; चौथ्यांदा फॉलोऑननंतर सामना वाचवला –
Shubman Gill on follow on 🗣️
We weren’t sure with the weather around that we will have a full game hence we went for the follow on. This is a game of cricket and Test cricket won in the end.
#INDvSL #Cricket pic.twitter.com/lZfG7UAOFJ
— CREX (@Crex_live) August 27, 2026
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात श्रीलंकेने आतापर्यंत २८ वेळा फॉलोऑनचा सामना केला आहे. त्यापैकी २४ सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला, तर केवळ ४ सामने अनिर्णित राखण्यात त्यांना यश आले आहे. यापूर्वी श्रीलंकेने १९९४ मध्ये झिम्बाब्वे, २००६ मध्ये लॉर्ड्सवर इंग्लंड आणि २०१० मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध फॉलोऑन मिळूनही सामना वाचवला होता. आता तब्बल १६ वर्षांनंतर त्यांनी भारताविरुद्ध अशी झुंजार कामगिरी करत पराभव टाळला आहे.





