Team India : टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार ठरला! बीसीसीआय ‘या’ दिवशी करणार अधिकृत घोषणा

Shubman Gill Named Team India’s New Test Captain : भारताला पुढील महिन्यात जूनमध्ये इंग्लंडचा दौरा करायचा आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. पण, रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यापासून नवीन कर्णधाराचा शोध सुरू आहे. पण आता बीसीसीआयचा हा शोध संपला आहे आणि टीम इंडियाला एक नवीन कसोटी कर्णधार मिळाला आहे.
लवकरच होणार नव्या कर्णधाराची घोषणा –
मीडिया रिपोर्टनुसार इंग्लंड दौऱ्यासाठी भारताचा नवा कसोटी कर्णधार शुबमन गिलच्या नावावर एकमत झाले, असून लवकरच घोषणा केली जाईल. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय लवकरच त्याची अधिकृत घोषणा करणार आहे.
मुंबईत पार पडणार निवड समितीची बैठक –
Shubman Gill will be announced as Indian Test Captain on May 23 or 24. [Abhishek Tripathi]
Gill has already meet Agarkar & Gambhir for the future plans. 🇮🇳 pic.twitter.com/NAace1GNLM
— Johns. (@CricCrazyJohns) May 11, 2025
मीडिया रिपोर्ट्नुसार शुबमन गिलच्या कर्णधारपदाची घोषणा २३ किंवा २४ मे रोजी होऊ शकते. त्याच दिवशी मुंबईत निवड समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत केवळ नवीन कर्णधाराची घोषणा केली जाणार नाही, तर इंग्लंड दौऱ्यासाठी संघाची घोषणा देखील केली जाईल. शुबमन गिलला कर्णधारपदाबद्दलच्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर व्यवस्थापनातील अनेक सदस्यांशी त्याने चर्चा केली आहे. आता याबाबत बीसीसीआय लवकरच पत्रकार परिषद घेऊन गिलला भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित करू शकते.
हेही वाचा – India Test Captaincy : गिल किंवा पंतला नव्हे, तर ‘या’ खेळाडूला कर्णधार करा; एमएसके प्रसाद यांची मागणी
त्यामुळे शुबमन गिल पहिल्यांदाच इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. आता, पुढील डब्ल्यूटीसी सायकलमध्ये गंभीर आणि गिलची जोडी भारतीय संघाला किती पुढे घेऊन जाते हे पाहणे खूप मनोरंजक असेल. परंतु, रोहितनंतर विराट कोहलीही निवृत्त होत असल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत, असा प्रश्न देखील उपस्थित होतो की जर कोहलीनेही कसोटी क्रिकेटला अलविदा म्हटले तर रोहित आणि त्याच्या जागी संघात कोणाचा समावेश केला जाईल.





