Shubman Gill Injury : शुबमन गिलच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट! पुढच्या सामन्यात खेळणार की नाही? पार्थिव पटेलने केलं स्पष्ट
Shubman Gill Injury : गिल नक्की कधी पुनरागमन करणार, या प्रश्नाने चाहत्यांना काळजीत टाकले असतानाच आता संघाचे सहाय्यक प्रशिक्षक पार्थिव पटेल यांनी यावर मोठे अपडेट दिले आहे.

Shubman Gill Injury Update IPL 2026 : राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात शुबमन गिलच्या जागी राशिद खान नाणेफेकीसाठी आल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. राशिदने तेव्हा स्पष्ट केले होते की, गिलच्या स्नायूंना पीळ (Muscle Spasm) पडल्याने तो खेळू शकणार नाही. आता ८ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी गुजरातचे असिस्टंट कोच पार्थिव पटेल यांनी गिलच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
गिलच्या दुखापतीबाबत काय अपडेट?
शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सला कर्णधार गिलच्या गैरहजेरीत राजस्थान रॉयल्सविरुद्ध अवघ्या ६ धावांनी पराभव पत्करावा लागला. ज्यामुळे गुजरातचे चाहते गिलच्या पुनरागमनाची वाट पाहत आहे. अशात पार्थिव पटेल यांनी गिलच्या पुनरागमनाबद्दल महत्त्वाची अपडेट दिली आहे. पार्थिव पटेल म्हणाले, “गेल्या दोन दिवसांपासून शुबमनला स्नायूंचा त्रास होत आहे. ही दुखापत फारशी गंभीर वाटत नाहीये. आम्हाला आशा आहे की तो पुढच्या सामन्यासाठी फिट असेल, पण अंतिम निर्णय वैद्यकीय पथक घेईल.”
“PBKS bowled cleverly in final overs: GT assistant coach Parthiv Patel reflects on his side loss
Read @ANI Story |https://t.co/h2sthC1MK0#PBKS #GT #ParthivPatel #IPL2026 pic.twitter.com/KGEgcB6WW6
— ANI Digital (@ani_digital) April 1, 2026
दुखापतींचा ‘चौकार’ आणि चिंतेचे वातावरण –
It’s not the same without you! Come back stronger champ 💪🏻#ShubmanGill pic.twitter.com/C1ojp2RwRS
— DRS (@drrichaks) April 5, 2026
गेल्या १८ महिन्यांत शुबमन गिल दुखापतग्रस्त होण्याची ही चौथी वेळ आहे, ज्यामुळे त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये मानेच्या त्रासामुळे तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीतून बाहेर पडला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२४ मध्ये अंगठ्याच्या दुखापतीमुळे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मुकला. नोव्हेंबर २०२५ मध्ये पुन्हा मानेच्या दुखापतीने त्याला सतावले आणि आता आयपीएल २०२६ मध्ये स्नायूंच्या त्रासामुळे (Muscle Spasm) त्याला मैदानाबाहेर बसावे लागले आहे.
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात खेळणार का?
गुजरातचा पुढचा सामना ८ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आहे. पार्थिव पटेल यांनी आशा व्यक्त केली असली, तरी गिल खेळणारच याची शाश्वती अद्याप कोणाकडेही नाही. गिल हा गुजरातच्या फलंदाजीचा मुख्य कणा आहे, त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत संघाचे संतुलन बिघडू शकते. गुजरातचे चाहते सध्या ‘प्रिन्स’ गिलच्या लवकरात लवकर मैदानात परतण्यासाठी प्रार्थना करत आहेत.





