Shubman Gill Record : शुबमन गिलचा दिल्लीत ‘चौकार-षटकारांचा’ धमाका! IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला सर्वात तरुण खेळाडू
Shubman Gill Record : गुजरात टायटन्स (GT) संघाचा कर्णधार शुबमन गिल याने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तुफानी फलंदाजी करत एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे.

Shubman Gill 500 IPL Boundaries Record : आयपीएल २०२६ च्या १४ व्या सामन्यात गुजरात टायटन्स (GT) संघाचा कर्णधार शुबमन गिलने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध तुफानी फलंदाजी केली. यासह त्याने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर गिलने केवळ आपल्या धावांनीच नाही, तर ‘चौकार-षटकारांच्या’ विशेष पल्ला गाठून दिग्गजांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
शुबमन गिलने केला मोठा पराक्रम –
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ४५ चेंडूंत ७० धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत ४ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसह गिलने आयपीएल कारकिर्दीत ५०० बाउंड्री (चौकार + षटकार) पूर्ण करण्याचा टप्पा ओलांडला आहे. हा पराक्रम त्याने ११७ डावांमध्ये केला असून, तो आयपीएल इतिहासात सर्वात वेगाने हा टप्पा गाठणाऱ्या टॉप-५ खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे.
दिग्गजांच्या यादीत घेतली भरारी –
Shubman Gill with a MASSIVE knock for the Gujarat Titans 70 runs off just 45 balls! 💙🔥
Smashing 5 sixes and 4 fours#IPL #TATAIPL #shubmanGill #GTvsDC pic.twitter.com/GyhhfDCef3
— SharpEyeGill (@BroAfghan27801) April 8, 2026
आयपीएलमध्ये सर्वात वेगाने ५०० बाउंड्री पूर्ण करण्याचा विक्रम ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलच्या नावावर आहे, ज्याने केवळ ८७ डावात ही किमया केली होती. गिल आता जोस बटलर (१०१), डेव्हिड वॉर्नर (१०५) आणि केएल राहुल (१०५) यांच्यासोबत या खास यादीत विराजमान झाला आहे. गिलच्या नावावर आता एकूण ३८२ चौकार आणि १२४ षटकार (एकूण ५०६ बाउंड्री) जमा आहेत.
गुजरात टायटन्सने उभारला धावांचा डोंगर –
शुबमन गिल आणि अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर यांच्यातील तिसऱ्या विकेटसाठी झालेल्या शतकीय भागीदारीमुळे गुजरातने दिल्लीसमोर २१०/४ अशी विशाल धावसंख्या उभारली. सुंदरने ३२ चेंडूंत ५५ धावा कुटल्या, तर जोस बटलरनेही २७ चेंडूंत ५२ धावांची दमदार खेळी केली. गिलची ही शानदार खेळी १५ व्या षटकात लुंगी एनगिडीने संपवली, मात्र तोपर्यंत त्याने गुजरातला भक्कम स्थितीत नेऊन ठेवले होते.





