Jasprit Bumrah Wicketless : जसप्रीत बुमराहची ‘दहशत’ संपली? १० वर्षांनंतर ‘यॉर्कर किंग’वर ओढवली नामुष्की, मुंबई इंडियन्सचं टेन्शन वाढलं
Jasprit Bumrah Wicketless : जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जाणारा जसप्रीत बुमराह या हंगामात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेला नाही.

Jasprit Bumrah Wicketless IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात मुंबई इंडियन्स (MI) संघासाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज मानला जाणारा जसप्रीत बुमराह या हंगामात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करू शकलेला नाही. विशेष म्हणजे, टी-२० क्रिकेटमध्ये तब्बल ८ वर्षांनंतर बुमराहवर विकेट्ससाठी तरसण्याची वेळ आली आहे.
आयपीएलच्या १९ व्या हंगामात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, परंतु त्यापैकी केवळ एकच सामना त्यांना जिंकता आला आहे. मुंबईच्या या खराब कामगिरीमागे त्यांचे मुख्य अस्त्र जसप्रीत बुमराहची ‘धार’ कमी होणे हे एक मोठे कारण मानले जात आहे. या हंगामात फलंदाज बुमराहविरुद्ध आक्रमक फटके मारण्याऐवजी अत्यंत सावध खेळ करत आहेत, जेणेकरून त्याला विकेट मिळणार नाही. फलंदाजांची ही रणनीती यशस्वी ठरताना दिसत असून बुमराहचा दबदबा यंदा कमी झाला आहे.
८ वर्षांनंतरची सर्वात खराब कामगिरी –
MOST SIXES AGAINST #JASPRITBUMRAH IN #IPL,#ABdeVilliers – 8 sixes#ViratKohli – 6 sixes#JPDuminy – 6 sixes#KieronPollard – 5 sixes#PatCummins – 4 sixes#AndreRussell – 4 sixes#DineshKarthik – 3 sixes#GlennMaxwell – 3sixes#VaibhavSuryavanshi – 2 sixes pic.twitter.com/B8kifysBlF
— Naval Kishor (@NavalKisho88666) April 8, 2026
जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीत ८ वर्षांनंतर असा प्रसंग आला आहे, जेव्हा तो सलग तीन टी-२० सामन्यांत एकही विकेट्स घेऊ शकलेला नाही. यापूर्वी २०१७-१८ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांत तो विकेटविना राहिला होता. आयपीएलचा विचार केला तर, तब्बल १० वर्षांनंतर बुमराह सलग तीन सामन्यांत विकेटलेस राहिला आहे. २०१६ मध्ये त्याच्यासोबत असा प्रकार घडला होता.
आयपीएल २०२६ मधील बुमराहचा स्पेल:
- केकेआर विरुद्ध : ४ षटके, ३५ धावा, ० विकेट
- डीसीविरुद्ध : ४ षटके, २१ धावा, ० विकेट
- आरआर : ३ षटके, ३२ धावा, ० विकेट (पावसामुळे सामना ११ ओव्हर्सचा होता)
हेही वाचा – BCCI New Rules : BCCI च्या नव्या फतव्यामुळे आयपीएलमध्ये खळबळ! आता ‘या’ खेळाडूंच्या वावरावर बंदी; पाळावे लागणार ‘हे’ नियम
मुंबई इंडियन्ससमोर मोठे आव्हान –
पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी बुमराहचा हा ‘आऊट ऑफ फॉर्म’ चिंतेचा विषय आहे. सध्या मुंबईचा संघ गुणतालिकेत ७ व्या क्रमांकावर असून त्यांचा नेट रन रेटही उणे (-०.७१५) आहे. मुंबईला आपला पुढचा सामना १२ एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध खेळायचा आहे. चिन्नास्वामीच्या फलंदाजीला पोषक खेळपट्टीवर बुमराह आपल्या विकेट्सचा दुष्काळ संपवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





