Shubman Gill break Dhoni Record : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेचा पहिला सामना पर्थ येथील ऑप्टस स्टेडियमवर रंगला. मात्र, भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. पहिल्या १० षटकांतच भारताचे अव्वल तीन फलंदाज तंबूत परतले. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या ८ धावांवर, तर विराट कोहली शून्य धावांवर बाद झाला. नवनिर्वाचित वनडे कर्णधार शुबमन गिललाही आपली छाप पाडता आली नाही. तो नॅथन एलिसच्या गोलंदाजीवर केवळ १० धावा काढून बाद झाला. शुबमन गिलने रचला इतिहास – पर्थमध्ये फलंदाजीत अपयश आले तरी शुबमन गिलने एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या मालिकेसाठी गिलला वनडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली होती. ऑप्टस स्टेडियमवर गिल प्रथमच वनडे कर्णधार म्हणून मैदानात उतरला आणि त्याने एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडला. वयाच्या २६ वर्षे आणि ४१ दिवसांत गिल भारताचा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-२०) कर्णधारपद भूषवणारा सर्वात युवा खेळाडू ठरला. धोनीने हा विक्रम २६ वर्षे आणि २७९ दिवसांत नोंदवला होता, तर वीरेंद्र सेहवाग २८ वर्षे आणि ४३ दिवसांसह या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. सामन्यात पावसाचा व्यत्यय, ऑस्ट्रेलियासमोर १३१ धावांचे लक्ष्य या सामन्यात पावसाने चार वेळा व्यत्यय आणला, ज्यामुळे सामना ५० षटकांऐवजी २६ षटकांचा झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने २६ षटकांत ९ बाद १३६ धावा केल्या. केएल राहुलने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली, तर अक्षर पटेलने ३१ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलवूड, मिचेल ओवेन आणि मॅथ्यू कुह्नमन यांनी प्रत्येकी २ बळी घेतले, तर नॅथन एलिस आणि मिचेल स्टार्क यांना प्रत्येकी १ बळी मिळाला. हेही वाचा – Virat Kohli : ‘अपमानापासून ते सन्मानापर्यंत…’, विराटने सांगितली आस्ट्रेलियात मिळालेल्या प्रेम आणि द्वेषाची संपूर्ण कहाणी पावसामुळे डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर २६ षटकांत १३१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. भारताची ही खराब सुरुवात मालिकेत पुनरागमनासाठी आव्हानात्मक ठरेल. आता सर्वांचे लक्ष गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ कसे प्रदर्शन करतो यावर आहे.