GT vs MI : शुबमन गिलने रचला इतिहास! आयपीएलमध्ये कोणत्याच भारतीय खेळाडूला न जमलेला केला पराक्रम

GT vs MI Shubman Gill complete 1000 runs in Narendra Modi Stadium in IPL : गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल २०२५ चा ९वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी गुजरात संघाने चांगली सुरुवात केली. शुबमन गिल आणि साई सुदर्शन या सलामी जोडीने पहिल्या ६ षटकांत स्फोटक फलंदाजी केली आणि ६६ धावा फटकावल्या. या काळात दोन्ही फलंदाजांनी ३२-३२ धावांचे योगदान दिले. या छोट्या खेळीच्या जोरावर गिलने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नवा पराक्रम केला आहे.
शुबमन गिलच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १००० धावा पूर्ण –
शुबमन गिलने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ३२ धावा करताच १००० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने फक्त २० व्या डावात ही कामगिरी केली. यासह, शुबमन गिल आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही स्टेडियममध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा भारतीय खेळाडू बनला आहे. या बाबतीत, त्याने सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला आहे.
Ek hi to dil hai, har bar jeet lete ho! 💙
Our Prince becomes the 2nd fastest player to reach 1000 runs at an IPL venue! 🏟 pic.twitter.com/2ZXnvC30U6
— Gujarat Titans (@gujarat_titans) March 29, 2025
ज्याने वानखेडे स्टेडियमवर हा पराक्रम करण्यासाठी ३१ डाव घेतले होते. गिलने केवळ २० डावांमध्ये ही कामगिरी केली. त्याच वेळी, एकाच आयपीएल ठिकाणी सर्वात जलद १००० धावा करण्याचा विश्वविक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात युनिव्हर्स बॉसने केवळ १९ डावांमध्ये ही कामगिरी केली होती.
हेही वाचा – CSK vs RCB : सीएसकेला आरसीबीविरुद्धचा पराभव पडला महागात! नावावर झाली ‘या’ लाजिरवाण्या विक्रमाची नोंद
आयपीएलमध्ये कोणत्याही मैदानावर सर्वात जलद १००० धावा करणारे खेळाडू :
१९ डाव – ख्रिस गेल, बंगळुरू
२० डाव – शुबमन गिल, अहमदाबाद*
२२ डाव – डेव्हिड वॉर्नर, हैदराबाद
२६ डाव – शॉन मार्श, मोहाली
३१ डाव - सूर्यकुमार यादव, वानखेडे
हेही वाचा – Shikhar Dhawan : शिखर धवनने रजत आणि असीमच्या भांडणात घेतली उडी, VIDEO होतोय व्हायल
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स त्यांचे पहिले सामने गमावल्यानंतर येथे पोहोचले आहेत. गुजरातला त्यांच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून पराभव पत्करावा लागला, तर एमआयला चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव पत्करावा लागला. दोन्ही संघ हा सामना जिंकून पॉइंट टेबलमध्ये विजयाचे खाते उघडण्यासाठी उत्सुक असतील.





