Shrimant Bhau Rangari Ganpati: कलाकार, राजकारण्यांनी घेतले श्रीमंत भाऊ रंगारी बाप्पांचे दर्शन
Shrimant Bhau Rangari Ganpati: कलाकार, राजकारणी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पांचे मंगळवारी दर्शन घेतले.

Shrimant Bhau Rangari Ganpati: कलाकार, राजकारणी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पांचे मंगळवारी दर्शन घेतले. ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते ट्रस्टच्या वतीने त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
यामध्ये निर्माते, लेखक, दिग्दर्शक, अभिनेते सुबोध भावे यांनी श्रींचे दर्शन घेऊन आरती केली. त्यानंतर उच्च-तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्नी अंजली यांच्यासह आरती करून दर्शन घेतले.
अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर आणि अभिनेते विजय आंदळकर यांनी देखील श्रींचे दर्शन घेऊन आरती केली. बिग बॉस सीजन सहाची विजेती तन्वी कोलते हिने देखील उत्सव मंडपात भेट देऊन श्रींचे दर्शन घेऊन आरती केली.
सायंकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा सर (कोल्हापूर परिक्षेत्र) यांनी देखील बाप्पांचे दर्शन घेऊन आरती केली.





