श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लोकसभा लढणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली दरेकर नेमक्या कोण आहेत ?

Shrikant Shinde Vs Vaishali Darekar : शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे गट झाल्यानंतर लोकसभेत अनेक मतदारसंघामध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. त्यापैकीच एक मतदार संघ म्हणजे कल्याण-डोंबिवली लोकसभा. या मतदार संघातून श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाने शिवसेनेच्या महिला नेत्याला उमेदवारी दिली आहे. | Shrikant Shinde Vs Vaishali Darekar
ठाकरे गटाने आपल्या चार उमेदवारांची यादी काल जाहीर केली. त्यामध्ये कल्याण डोंबिवली मधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.शिवसेना मनसे आणि पुन्हा ठाकरे गट असा वैशाली दरेकर यांचा प्रवास राहिलेला आहे.
कोण आहेत वैशाली दरेकर ?
वैशाली दरेकर या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. मात्र राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केल्यानंतर त्या मनसेत सामील झाल्या. त्यांनी २००९ मध्ये मनसेकडून लोकसभा लढवत पहिल्या प्रयत्नात एक लाखाहून अधिक मत मिळवली होती. | Shrikant Shinde Vs Vaishali Darekar
त्यानंतर त्या २०१० मध्ये कल्याण डोंबिवली मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या त्यानंतर त्यांनी महापालिकेत विरोधी पक्षनेते पद देखील भूषवलं होत. विशेष म्हणजे शिवसेनेत फूट पडल्यानंतर वैशाली दरेकर या शिंदे गटात न जाता ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्या.
ठाकरे गटाने जाहीर केले चार उमेदवार
जळगावमधून करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पालघरमधून भारती कामडी यांना तर हातकणंगलेमधून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कल्याण-डोंबिवलीतून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. | Shrikant Shinde Vs Vaishali Darekar





