केळगावात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात

आळंदी – श्रीक्षेत्र आळंदीसह केळगाव (ता. खेड) येथे श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांचा प्रकट दिन मंदिरात अतिशय उत्साहात व विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. तेथील जोशी परिवार हे गेली अनेक वर्षांपासून स्वामी समर्थांचा प्रगट दिन अतिशय उत्साही वातावरणात साजरा करतात.
राजेंद्र जोशी, जनक कुमार जोशी, आकाश जोशी व अंकित जोशी हे परिवार आपले थोरले बंधू कै.अरुण जोशी यांची परंपरा कायम ठेवत आहेत. त्याच बरोबर येथून जवळच असलेले केळगाव येथील तुळवे कुटुंब देखील हाच उपक्रम गतवर्षीपासून राबवित आहेत.
यानिमित्ताने रविवारी (दि. 3) मंदिराचे व्यवस्थापक प्रा. डॉ. मुकुंद सोनवणे, तुळवे मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजू तुळवे, नेत्रा तुळवे, सौरभ साळवे, ऋषिकेश शेलार, रूनाल शेलार यांच्या हस्ते श्रींचा महाअभिषेक करण्यात आला. सोमनाथ मुंगसे, प्रा. सुभाष सोनवणे, सतीश सोनवणे यांच्या हस्ते महाप्रसादाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. तसेच इतर आध्यात्मिक कार्यक्रम साजरे करण्यात आले.





