पुणे: ‘गोखले बिझनेस बे’ संकुलाच्या आलिशान लॉबीत श्री स्वामी समर्थांच्या भव्य चित्राचे अनावरण

पुणे : गोखले कंस्ट्रक्शन्सच्या सध्या सुरु असलेल्या नवरात्रातील प्रॉपर्टी फेस्टिव्हल दरम्यान कोथरूड येथे साकारत असलेल्या ‘गोखले बिझनेस बे’ या व्यापारी संकुलाच्या आलिशान व प्रशस्त लॉबीच्या दर्शनी भागात लावण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थांच्या भव्य अशा चित्राचे अनावरण गिरनार देवस्थानचे विश्वस्त व जुनागढ पीठाचे पीठाधीश स्वामी महेश गिरी यांच्या हस्ते व राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी गोखले कंस्ट्रक्शन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विशाल गोखले, संचालिका पूनम गोखले, चित्रकार शेखर साने, अन्वी गोखले व अर्चित गोखले आदी उपस्थित होते.
अॅक्रॅलिक माध्यमातून साकारलेले हे चित्र १९ X १० फुट इतक्या आकाराचे असून सुप्रसिद्ध चित्रकार शेखर साने यांनी चितारलेले स्वामींचे हे आजवरचे सर्वात मोठे चित्र आहे. याप्रसंगी बोलताना स्वामी महेश गिरी म्हणाले की, गोखले कुटुंबियांची ही कृती त्यांच्यावरील संस्कार दर्शवते. व्यवसाय करून संपत्ती निर्माण करताना संस्काराच्या महत्वाची जाणीव गोखले कुटुंबीयांना आहे हे पाहून आनंद झाला आणि त्यामुळेच त्यांच्या हातून भव्य अतिभव्य काम घडते आहे. यावेळी चंद्रकांत पाटील, विशाल गोखले व शेखर साने यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
‘गोखले बिझनेस बे’ च्या पहिल्या टप्प्याचे काम हे आता जवळ जवळ पूर्ण होत आले असून लवकरच ताबा देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्याचे काम देखील वेगाने सुरु असल्याची माहिती विशाल गोखले यांनी दिली.





