Shreyas First Win : “सलग ६ पराभवांनंतर हा विजय…”, कर्णधार म्हणून पहिला विजय मिळवल्यानंतर श्रेयस अय्यरची प्रतिक्रिया
Shreyas First Win : गुरुवारी हरारे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

Shreyas Iyer 1st T20I Win As Captain IND vs ZIM 1st T20I Harare : आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावरील सलग ६ मानहानिकारक पराभवांनंतर अखेर भारतीय टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) कॅप्टन म्हणून पहिला-वहिला विजय मिळाला आहे. गुरुवारी हरारे येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयाचे मुख्य शिल्पकार वेगवान गोलंदाज मयंक यादव (१८ धावांत २ बळी) आणि १५ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी (१९ चेंडूंत ५० धावा) ठरले.
सलग ६ पराभवांनंतर हा विजय खूप महत्त्वाचा –
सामन्यानंतर भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरने संघाच्या कामगिरीचे कौतुक करताना म्हटले, “सलग ६ पराभवांनंतर हा विजय खूप महत्त्वाचा होता. आमच्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. आम्ही आखलेली रणनीती त्यांनी मैदानावर प्रभावीपणे राबवली. कर्णधार म्हणून हा माझा पहिलाच विजय असल्याने तो माझ्यासाठी खास आहे. खेळपट्टीवर चेंडू चांगला उसळी घेत होता. मयंकने सुरुवातीलाच अचूक गोलंदाजी करत आम्हाला दमदार सुरुवात करून दिली आणि प्रतिस्पर्धी फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याची संधी दिली नाही.”
वैभव सूर्यवंशी हा निर्भय युवा फलंदाज –
🚨 SHREYAS IYER ON VAIBHAV SOORYAVANSHI 🔥🇮🇳
“Vaibhav Sooryavanshi came out and gave us an exceptional start with the bat. He is fearless, the way he approaches the innings is amazing. He possesses immense confidence when he steps onto the field.”
— Captain Shreyas Iyer ⭐… pic.twitter.com/t1oWqclQpL
— KUMAR (@MyCric101) July 23, 2026
श्रेयस अय्यर पुढे म्हणाला, “तसेच, मी आधीही सांगितल्याप्रमाणे वैभव सूर्यवंशी हा निर्भय युवा फलंदाज आहे. त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली. याआधीही तो या मैदानावर खेळला आहे. तसेच, अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात त्याने १७५ धावांची शानदार खेळी साकारली होती.”
मयंक यादवचा धुमाकूळ; झिम्बाब्वेला १२५ धावांवर रोखले!
प्रथम फलंदाजी करताना मयंक यादवने डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेत झिम्बाब्वेला बॅकफूटवर ढकलले. पॉवरप्लेमध्येच ३ धक्के बसल्यानंतर सिकंदर रझा (३२), वेस्ली मधेवेरे (३९) आणि मारुमानी (नाबाद २७) यांनी झुंज देत संघाला २० षटकांत ७ बाद १२५ धावांपर्यंत पोहोचवले. भारताकडून मयंक यादव आणि प्रिन्स यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबे व रवी बिश्नोई यांना १-१ विकेट्स मिळाली.
वैभव-इशानची आतषबाजी अन् श्रेयसची विजयी फिनिशिंग!
🚨Shreyas Iyer’s Captaincy Record 🇮🇳
Matches – 8
Wins – 1
Losses – 6
No Result – 1
Win % – 12.50%India finally registered their first T20I win under Shreyas Iyer after defeating Zimbabwe in the 1st T20I. pic.twitter.com/QlppGin9Fr
— Shubh 🏏 (@HexaStatz) July 23, 2026
उत्कृष्ट गोलंदाजीसाठी मयंक यादवला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने अवघ्या १८ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५० धावांची आतिशी पारी खेळली. त्यानंतर इशान किशनने २४ चेंडूंत ३५ धावा, तर कर्णधार श्रेयस अय्यरने २४ चेंडूंत नाबाद २८ आणि तिलक वर्माने नाबाद ६ धावा करत १३.२ षटकांतच विजय साकारला.





