Mayank Yadav Record : २ वर्षांनंतर पुनरागमन अन् पहिल्याच बॉलवर थेट विकेट! मयंक यादवने हरारेत रचला इतिहास
Mayank Yadav Record : या सामन्यात मयंक यादवने पहिल्याच चेंडूवर विकेट घेत खास पराक्रम केला. यानंतर टीम इंडियाने झिम्बाब्वेचा डाव ७ बाद १२५ धावांवर रोखला.

Mayank Yadav Wicket 1st Ball IND vs ZIM1st T20I Harare Record : तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय टी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या वेगवान गोलंदाज मयंक यादवने (Mayank Yadav) मोठा पराक्रम केला आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. झिम्बाब्वेविरुद्ध हरारे येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात मयंकने आपल्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम करत इतिहास रचला आहे. त्याच्या तुफानी वेगासमोर झिम्बाब्वेचा सलामीवीर ब्रायन बेनेट क्षणभरही टिकू शकला नाही.
डीआरएसने (DRS) उघडले यशाचे दार!
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत कर्णधार श्रेयस अय्यरने नवीन चेंडू मयंक यादवच्या हाती सोपवला. मयंकने पहिल्याच चेंडूवर बेनेटला यष्टीरक्षक इशान किशनकडे झेलबाद केले. मैदानी अंपायरने नाबाद दिल्यानंतर इशान किशनच्या ठाम विश्वासावर श्रेयस अय्यरने ‘डीआरएस’ घेतला. रिप्लेमध्ये चेंडू बॅटची कडा घेऊन गेल्याचे स्पष्ट दिसल्याने निर्णय भारताच्या बाजूने लागला.
मयंक यादवने रचला इतिहास –
Wicket on the very first delivery! ⚡️
How’s that for a start from Mayank Yadav 😎
A successful review from #TeamIndia 👏👏
Follow the match ▶️ https://t.co/NKa0znQQ3H#ZIMvIND pic.twitter.com/MmHx5RXQVz
— BCCI (@BCCI) July 23, 2026
या ऐतिहासिक विकेटसह मयंक यादव टी-२० सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा भारताचा केवळ तिसरा गोलंदाज बनला आहे. यापूर्वी अर्शदीप सिंग (२०२४ टी-२० वर्ल्ड कप विरुद्ध अमेरिका) आणि हार्दिक पंड्या (२०२५ आशिया कप विरुद्ध पाकिस्तान) यांनी हा पराक्रम केला होता.
खास क्लबमध्ये पटकावले स्थान –
#INDvZIM | Mayank Yadav marked his return to international cricket in style, striking twice as #TeamIndia restricted Zimbabwe to 125/7 in the first T20I.
The express pacer dismissed Brian Bennett with the very first ball of the #INDvsZIM match and went on to take one more… pic.twitter.com/Is4MW0PI00
— Salar News (@EnglishSalar) July 23, 2026
एवढेच नाही तर, आंतरराष्ट्रीय टी-२० च्या आपल्या डावातील पहिल्याच चेंडूवर कारकिर्दीत दोनदा विकेट घेणारा मयंक चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०२४ मध्ये हैदराबाद येथे बांगलादेशविरुद्धही त्याने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली होती. या यादीत भुवनेश्वर कुमार (३ वेळा) अव्वल स्थानावर असून, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग आणि मयंक यादव यांनी प्रत्येकी २-२ वेळा हा भीमपराक्रम केला आहे.





