श्रेयाची CID 2 मध्ये एन्ट्री; नेटकऱ्यांनी ‘या’ कारणामुळे व्यक्त केली नाराजी

CID 2 | सीआयडीच्या पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिवाजी साटम, दयानंद शेट्टी, हृषिकेश पांडे, जान्हवी छेडा, श्रद्धा मुसळे, आदित्य श्रीवास्तव, नरेंद्र गुप्ता या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. यातील प्रत्येक कलाकाराला या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर आता याचा दुसरा सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
सीआयडी हा शो १९९८ साली सुरू झाला आणि २०१८ पर्यंत या कार्यक्रमाने अविरतपणे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. यातील श्रेया व दया यांच्या जोडीचा चाहता वर्ग देखील निर्माण झाला होता. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोड मध्ये श्रेयाची एन्ट्री झाल्याचे पाहायला मिळाले. यात तिच्या लहान मुलीसह तिला पाहून सीआयडीची संपूर्ण टीम भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
View this post on Instagram
अभिनेत्रीने जान्हवी छेडाने सीआयडीमध्ये श्रेया ही भूमिका साकारली आहे. आता सीआयडी २ मध्ये इतक्या वर्षांनंतर अभिनेत्रीला पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आनंद झाला. मात्र तिला स्क्रीनवर फार कमी वेळ पाहायला मिळाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
एका नेटकऱ्याने लिहिले, “श्रेयाच्या पुनरागमनाची इतके दिवस वाट पाहिल्यानंतर ती फक्त ३० सेंकदच स्क्रीनवर दिसली. निर्माते फक्त तिचा टीआरपीसाठी वापर करत आहे. ” तसेच “तिला ऑफिसर म्हणून परत आणा”, “आम्हाला श्रेया कायमची सीआयडीमध्ये पाहिजे”, अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे या शोमध्ये डॉ. तारिकाचीही पुन्हा एन्ट्री होणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे अभिजीत-तारिका हा लव्ह अँगल पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो.
हेही वाचा:





