Lockup 2 Winner: ‘लॉक अप २’ ची विजेती ठरली श्रेया कालरा, मिळाले करोडो रुपयांचे बक्षीस
Lockup 2 Winner: श्रेयाने फायनलमध्ये शिवांगी जोशीसह इतर चार फायनलिस्टला मागे टाकत हे विजेतेपद पटकावले.

Lockup 2 Winner: ‘लॉक अप २’चा ग्रँड फिनाले मोठ्या दिमाखात पार पडला. ‘लॉक अप २’ ची विजेता सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर श्रेया कालरा ठरली आहे. तिने विजेतेपदाचा मान पटकावला आहे.
श्रेया कालराला ‘लॉक अप २’ च्या चकचकीत ट्रॉफीसोबत तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. संपूर्ण सीझनमध्ये श्रेयाचा गेम, तिचा आत्मविश्वास आणि रणनीतीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. तिच्या या विजयानंतर चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली असून सोशल मीडियावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
‘लॉकअप २’ या रिॲलिटी शोच्या ग्रँड फिनालेमध्ये पाच स्पर्धकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळाली. अंतिम टप्प्यापर्यंत शिवांगी जोशी आणि श्रेया कालरा यांच्यात अत्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला.
दीर्घकाळ चाललेल्या या स्पर्धेत श्रेया कालरा हिने तिचे सर्वोत्तम योगदान देत ट्रॉफीवर आपले नाव कोरले. तिने फायनलमध्ये शिवांगी जोशीसह इतर चार फायनलिस्टला मागे टाकत हे विजेतेपद पटकावले. Lockup 2 Winner
View this post on Instagram
तर ‘लॉक अप २’ ची उपविजेती टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री शिवांगी जोशी ठरली. शोच्या टॉप ५ फायनलिस्टमध्ये श्रेया कालरा, शिवांगी जोशी, शिल्पा शिंदे, योगेश रावत आणि राम कपूर हे स्पर्धक होते. याआधी 2022 मध्ये झालेल्या ‘लॉक अप’चा विजेता मुनव्वर फारूकी ठरला होता.
कोण आहे श्रेया कालरा ?
श्रेया कालरा ही प्रसिद्ध सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर , अभिनेत्री, मॉडेल आणि रिॲलिटी टीव्ही स्टार आहे. ती पहिल्यांदा टिकटॉक वर प्रसिद्ध झाली. त्यानंतर या ॲपवर भारतात बंदी घातल्यानंतर, तिने Instagram आणि YouTube वर फॉलोअर्स तयार करून एक नवीन ओळख बनवली.
दरम्यान, यंदा ‘लॉक अप २’चे होस्टिंग रितेश देशमुख आणि फराह खान यांनी केले. त्यांच्या या जोडीला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. Lockup 2 Winner
हेही वाचा :





