अक्षय कुमारच्या ‘जॉली एलएलबी 3’ चित्रपटात दिसणार टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेता

Jolly LLB 3 | अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसीच्या ‘जॉली एलएलबी ३’ या चित्रपटात टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता राम कपूर ‘जॉली एलएलबी ३’ मध्ये पाहायला मिळणार आहे. नुकतंच एका पॉडकास्टमध्ये त्याने हा खुलासा केला.
एका पॉडकास्टमध्ये राम कपूरने सांगितले की, “जॉली एलएलबी कमाल सिनेमा आहे. मी याच्या तिसऱ्या पार्टमध्ये अक्षय आणि अर्शद वारसीप्रमाणेच वकिलाची भूमिका साकारणार आहे. माझी भूमिका तशी छोटी आहे पण परिणामकारक आहे. मी या सिनेमाचा भाग आहे याचाच मला आनंद आहे. याशिवाय मी आयुष्मान खुरानासोबतही काम करत आहे. सिनेमाचं थोडं शूट झालं आहे तर बाकीचं काश्मिरमध्ये होणार आहे. यासाठी लवकरच आम्ही काश्मिरला जाऊ. तसंच एक वेब ड्रामाही रिलीज होणार आहे. मी सर्व प्रोजेक्ट्ससाठी खूप उत्सुक आहे.”
View this post on Instagram
राम कपूरने पॉडकास्टमधील वजन कमी करण्याच्या प्रवासाबद्दल भाष्य केले. त्याने दीड वर्षात तब्बल ५५ किलो वजन कमी केलं आहे. वजन कमी होण्यापूर्वी तो सोशल मीडियावरून दुर झाला जेव्हा वजन कमी झाले तेव्हा सोशल मीडियावर पुन्हा सक्रिय झाला. राम कपूरने प्रेक्षकांना तंदुरुस्त राहण्याची शिफारस केली आहे, तसेच आपण आपले वाढते वय ग्रेसफुली स्वीकारले पाहिजे, असे त्याने सांगितले. Jolly LLB 3 |
दरम्यानम ‘जॉली एलएलबी ३’ यावर्षी एप्रिल महिन्यात रिलीज होण्याची शक्यता आहे. सिनेमाच्या पहिले दोन्ही भाग प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले होते. आता सर्वांनाच तिसऱ्या भागाची प्रतीक्षा आहे. Jolly LLB 3 |
हेही वाचा:
अर्थसंकल्पाआधी शेअर बाजाराची संथ सुरुवात, ‘या’ शेअर्समध्ये मोठी घसरण





