शिवांगी जोशीला मिळाली होती ‘हिरामंडी’मधील ‘या’ भूमिकेची ऑफर

Shivangi Joshi | शिवांगी जोशी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहचली. या मालिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर आता तिने नुकतेच एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. संजय लीला भन्साळींच्या गाजलेल्या ‘हीरामंडी’ सीरिजसाठी तिला ऑफर मिळाली होती. यासाठी तिने ऑडिशन्स दिली आणि या सीरिजसाठी तिला फायनलही करण्यात आले होते. मात्र अचानक तिला सीरिजमधून रिप्लेस करण्यात आले.
विशेष म्हणजे सीरिजमधील अभिनेत्री शर्मिन सेगल तिच्या अभिनयामुळे खूप ट्रोल झाली याच भूमिकेसाठी शिवांगीला ऑफर मिळाली होती. शिवांगी म्हणाली की, “टीव्हीनंतर मला ओटीटीकडून अनेक ऑफर येत होत्या. मी एका मोठ्या प्रोजेक्टसाठी ऑडिशनही दिले आणि निर्मात्यांना माझी ऑडिशन आवडली. अनेक ऑडिशन्स दिल्यानंतर, जेव्हा सर्वकाही फायनल झाले तेव्हा मला खात्री होती की मी तो प्रोजेक्ट करणार आहे. पण नंतर मला कळलं की मी तो प्रोजेक्ट करत नाही आणि माझ्या जागी दुसऱ्या व्यक्तीला कास्ट केलं आहे.”
Shivangi joshi was offered to play lead in heeramandi . Later she was replaced 😱😱😱. Ohh my god!! #Kaira #Yrkkh #homies #ShivangiJoshi & #MohsinKhan pic.twitter.com/dZ7ZK9vyge
— Vidushi (@vidushisam) July 24, 2024
पुढे ती म्हणाली, “जेव्हा मी यामागचे कारण विचारले तेव्हा मला सांगण्यात आले की माझी जागा घेणारी व्यक्ती एक स्टार किड आहे आणि मला हवे असल्यास मी या मालिकेत त्या स्टार किडच्या मैत्रिणीची भूमिका करू शकते. पण मग मी तो प्रोजेक्ट करायला नाही म्हटलं.”
संजय लीला भन्साळी यांची भाची शर्मीन सहगल हिने नेटफ्लिक्सवरील हीरामंडी या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारली होती आणि टीव्ही अभिनेत्री श्रुती सिन्हा तिची मैत्रीण बनली होती. शिवांगीच्या या मुलाखतीनंतर एका चाहत्याने चित्रपटसृष्टीत सुरू असलेल्या घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. अनेकांनी नेपोटिझममुळे शिवांगीला यात आलमजेबची भूमिका मिळाली नसल्याचे म्हंटले आहे. दरम्यान, भन्साळी प्रॉडक्शनने या मालिकेचा दुसरा सीझनही जाहीर केला आहे.
हेही वाचा:





