Newasa News : भेंडा नागेबाबा देवस्थानचा होणार कायापालट; शासनाकडून तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा निधी मंजूर
नेवासा तालुक्यातील (Newasa News) भेंडा बुद्रुक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र संत नागेबाबा मंदिर परिसराचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे.

Newasa News : नेवासा तालुक्यातील (Newasa News) भेंडा बुद्रुक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र संत नागेबाबा मंदिर परिसराचा चेहरामोहरा आता पूर्णपणे बदलणार आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोलाचे सहकार्य आणि आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या अविरत पाठपुराव्याला मोठे यश आले असून शासनाने या देवस्थानच्या सर्वांगीण विकासासाठी (Newasa News) तब्बल २ कोटी ५२ लाख ५९ हजार रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने या कामांसाठी प्रशासकीय मान्यता देत अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे.
शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना (ब वर्ग)’ अंतर्गत या तीर्थक्षेत्राचा विकास केला जाणार आहे. ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य निकष समितीच्या बैठकीत या प्रस्तावाची सखोल छाननी करून निधीची शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय निधीतून ही बहुप्रतिक्षित मंजुरी देण्यात आली आहे.
या निधीतून मंदिर परिसरात भाविकांच्या सोयीसाठी भव्य आधुनिक सभामंडप उभारण्यात येणार असून त्यावर २ कोटी रुपये खर्च केले जातील. याशिवाय मंदिर परिसरासाठी १० लाख रुपयांचा रूफ टॉप सोलर प्रकल्प, १७ लाख १ हजार ८५६ रुपयांचे विद्युतीकरण, तसेच आपत्कालीन सुरक्षेसाठी २० लाख रुपयांची अग्निशमन प्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत १ लाख रुपयांचे रेन वॉटर हार्वेस्टिंग, २ लाख ५७ हजार ५०० रुपयांचे वाहनतळ विकास आणि दिव्यांग भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी २ लाख रुपयांचा हँडीकॅप रॅम्प तयार करण्यात येणार आहे. या विकासकामांच्या मंजुरीमुळे संपूर्ण परिसरात (Newasa News) आनंदाचे वातावरण असून नागेबाबा मंदिर व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि भाविकांनी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांचे आभार मानले आहेत.






