Newasa News : आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते पिचडगाव येथील ऐतिहासिक ‘मुक्ताई बारव’चे लोकार्पण
र्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेला आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली शांत झोपलेला एक ऐतिहासिक ठेवा आता (Newasa News) पुन्हा एकदा नवसंजीवनी घेऊन खळाळू लागला आहे.

Newasa News : वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेला आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली शांत झोपलेला एक ऐतिहासिक ठेवा आता (Newasa News) पुन्हा एकदा नवसंजीवनी घेऊन खळाळू लागला आहे. पिचडगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील मैदानात वसलेल्या ऐतिहासिक ‘मुक्ताई बारव’चे रूपडे पालटले असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्पांतर्गत या बारवेचे बुधवारी मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या शुभहस्ते हा दिमाखदार सोहळा पार पडला.
लोकार्पणप्रसंगी बोलताना आमदार लंघे पाटील (Newasa News) यांनी, “आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेले हे पारंपरिक जलस्रोत केवळ पाण्याचे साठे नसून आपली समृद्ध संस्कृती आहे. ऐतिहासिक वारसा जपत जलसंधारण व पाणीसंवर्धनाला गती देणारा हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरेल.
या प्राचीन जलस्रोतांचे जतन, पुनरुज्जीवन आणि योग्य पुनर्वापर करून ते पुढच्या पिढीच्या हाती सुपूर्द करणे हीच आजच्या काळाची खरी गरज आहे,” असा ठाम विश्वास व्यक्त केला.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, नैनवाला फाउंडेशनचे मिलिंद वैद्य, सेवावर्धिनी पुण्याचे कार्याध्यक्ष सुहास लुंकड, सचिव सोमदत्त पटवर्धन, सरपंच उषाताई हजारे, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, गटविकास अधिकारी संजय लखवाल आणि शिवसेना नेते भाऊसाहेब मामा वाघ उपस्थित होते.
याशिवाय (Newasa News) किसन मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव काळे, ज्ञानेश्वर माऊली पेचे, नानाजी जाधव, नितीन जगताप, सतीश मुळे, अशोक टेकणे सर, ह.भ.प. माऊली महाराज हजारे, शिवाजीराव शेजुळ, अशोकराव ढगे सर, ह.भ.प. चैत्रालीताई महाराज, आदिनाथ निकम, दिगंबर वाघुले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते व पिचडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






