पुणे जिल्हा | श्री आनंद पतसंस्था अल्पवधीतच नावारुपाला आली

नारायणगाव, (वार्ताहर) – पारदर्शक कारभार आणि समाजाचे पाठबळ असलेली श्री आनंद नागरी सहकारी पतसंस्था अल्पवधीतच नावारुपाला आलेली आहे. पुढील काळात नावलौकिक असलेली संस्था म्हणून ओळख निर्माण करेल असे गौरवद्गार जुन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष अमित बेनके यांनी काढले.
दरम्यान, जैन ट्रस्टला नवीन स्थानक बांधण्यासाठी एक कोटीची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन बेनके यांनी दिले श्री आनंद पतसंस्थेची सर्वसाधारण सभा महावीर भवन येथे पार पडली त्यावेळी मार्गदर्शन करताना बेनके बोलत होते.
याप्रसंगी नारायणगावचे उपसरपंच योगेश ऊर्फ बाबू पाटे, संस्थेचे ऑडिटर ज्ञानेश्वर औटी, नारायणगाव जैन संघाचे अध्यक्ष विलास भळगट, उपाध्यक्ष पोपटलाल पोखरणा, सचिव अतुल कांकरिया, संचालक अशोक मुथा , पतसंस्थेचे संस्थापक अशोक गांधी, संस्थापक अध्यक्ष सचिन कांकरिया, उपाध्यक्ष धनेश शेलोत,
संचालक रमेश चोरडिया, सुयोग गांधी, महावीर खिवंसरा, संदेश कोठारी, दर्शना सरवदे-बोरा, विशाल वरवंटे, सुरेश गोसावी, कल्पेश गुगळे, शुभम मुनोत, अॅड. महावीर चोरडिया, पोपटलाल खिवंसरा, बाळासाहेब शेलोत, अभय चोरडिया,
सुनील चोरडिया, प्रवीण भन्साळी, सुभाष संकलेचा, राजूशेठ गांधी, ज्योती गांधी, सुनिता बोरा आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेच्या संचालिका हेमा लोढा, भक्ती पोखरणा यांनी, विषय वाचन व्यवस्थापक पूजा पुंडे यांनी तर सचिव निर्मल मुथा यांनी आभार मानले.
पतसंस्था सहा महिन्यांतच नफ्यात आली आहे. संचालक मंडळ तरुण व उत्साही असल्याने संस्थेची प्रगती होत आहे. पुढील वर्षी संस्थेला 4 लाख रुपये नफा होईल. – अशोक गांधी, संस्थापक, आनंद पतसंस्था
2 कोटी 76 लाख रुपये
कर्ज वाटप : 1 कोटी 55 लाख रुपये
नफा : सहा महिन्यांतच 2 लाख 58 हजार रुपये





