Shraddha kapoor | बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा मोठा चाहता वर्ग आहे. चित्रपटांच्या अपडेटसह तिच्या दैनंदिन जीवनातील घडामोडी ती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र सध्या श्रद्धा आणि तिचा बॉयफ्रेंड राहुल मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र फ्लाइट स्टाफने चोरून हा त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रविना टंडनने गोपनीयतेचा भंग केल्याचे म्हणत स्टाफला फटकारले आहे. श्रद्धा व राहुल एकत्र विमानातून प्रवास करत होते. तेव्हा तेथील विमानातील क्रू मेंबर्सनी दोघे एकमेकांशी गप्पा मारत असताना त्यांच्या नकळत त्यांचे फोटो काढले होते. त्यांचे हे फोटो व्हायरल होत आहेत. अभिनेत्री रवीना टंडनने आता यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. रवीनाने क्रू मेंबर्सना सुनावलं रवीनाने श्रद्धा राहुलचे त्यांच्या नकळत काढलेले फोटो पाहिल्यानंतर क्रू मेंबर्स सदस्यांना सुनावलं आहे. ती म्हणाली, “क्रू मेंबर्सने या जोडीच्या गोपनीयतेचे उल्लंघन केलं आहे. त्यांच्याकडून अशी कृती अपेक्षित नाही.” रविना टंडनसह अनेक सोशल मीडिया युजर्सनी सेलिब्रिटींच्या खासगी क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्या क्रू मेंबर्सवर टीका केली आहे. काही जणांनी व्हिडिओ बनवणाऱ्या मुलीला निलंबित करण्याची मागणी केली आहे, तर काही युजर्सनी व्हिडिओ तातडीने डिलीट करण्याची मागणी केली आहे. Shraddha kapoor | श्रद्धा आणि राहुल गेल्या बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. हे दोघे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या धाकट्या मुलाच्या प्री वेडिंगसाठी एकत्र जामनगरला जाताना पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले होते. Shraddha kapoor | हेही वाचा: Sharad Pawar : सरकारवर दबाव? रोहित पवारनंतर आता शरद पवार आझाद मैदानावर; पाठिंबा देत म्हणाले…