श्रद्धा कपूरला ‘ईठा’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दुखापत; नेमकं काय घडलं?

Updated On:
श्रद्धा कपूरला ‘ईठा’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दुखापत; नेमकं काय घडलं?

Shraddha Kapoor injured | अभिनेत्री श्रद्धा कपूर लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा‘ सिनेमात लवकरच पाहायला मिळणार आहे. प्रसिद्ध लावणी आणि तमाशा कलाकार विठाबाई नारायणगांवकर यांच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. मात्र या चित्रपटाच्या शुटिंगवेळी श्रद्धाला दुखापत झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या ‘ईठा’ सिनेमाचं शूट सध्या नाशिकजवळील एका गावात सुरु आहे. मात्र तिला फ्रॅक्चर झाल्यामुळे आता या चित्रपटाचे शूटिंग काही काळ थांबवण्यात आले आहे.

तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर यांच्यासारखी दिग्गज व्यक्तिरेखा पडद्यावर साकारणं आणि त्याप्रकारे उत्तम नृत्य करणं हे नक्कीच आव्हानात्मक आहे. हेच आव्हान पेलताना श्रद्धाला सेटवर दुखापत झाली. विठाबाई या महाराष्ट्राच्या दिग्गज लावणी क्वीनच्या भूमिकेत उतरण्यासाठी श्रद्धाने १५ किलोपेक्षा जास्त वजन वाढवल्याचेही समजते. Shraddha Kapoor injured |

नेमकं काय घडलं ?  

मीडिया रिपोर्ट्सनुसार, लावणी नृत्याच्या जलद ताल आणि सलग स्टेप्सच्या दरम्यान श्रद्धाने नऊवारी साडी, जड दागिने आणि कमरपट्टा घालून एक लांबलचक डान्स सीक्वेन्स शूट केला. सतत अनेक टेक घेताना एका स्टेपमध्ये तिने अचानक पूर्ण वजन डाव्या पायावर टाकले, त्यामुळे तिचा तोल गेला आणि गंभीर दुखापत झाली.

मुंबईत परतल्यानंतर मड आयलंड येथील सेटवर श्रद्धा काही इमोशनल सीनच्या चित्रीकरणात व्यस्त होती. मात्र काही दिवसांनी वेदना खूप वाढल्याने शूटिंग थांबवावी लागली. टीमने आता दोन आठवड्यांनी पुन्हा चित्रीकरण सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तोपर्यंत श्रद्धा पूर्णपणे बरी होईल अशी अपेक्षा आहे.

लक्ष्मण उतेकरांच्या ‘ईठा’ सिनेमाची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. सिनेमात रणदीप हुडा श्रद्धासोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रातील नाशिक, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये होणार आहे.  Shraddha Kapoor injured |

हेही वाचा : 

मुलाच्या एअर-शोचे व्हिडीओ YouTube वर शोधत असताना निधनाचे वृत्त समोर; कोण होते विंग कमांडर नमांश सियाल?

आणखी संबंधित बातम्या

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

2026-04-01 10:00:04

Riteish Deshmukh : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचा दमदार टीझर समोर

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...

2026-03-31 14:46:31

Aneet padda sister trolled : 'सैयारा' फेम अनित पड्डाची बहीण ट्रोलर्सच्या निशाण्यावर; 'धुरंधर २' चित्रपटाला प्रोपोगंडा म्हणताच...

Manisha Koirala : "...इतकाच शृंगार पुरेसा असतो'; सौंदर्याची परिभाषा बदलत मनीषा कोईरालाने शेअर केला ग्रे हेअर लूक

2026-03-31 12:06:37

Manisha Koirala : "...इतकाच शृंगार पुरेसा असतो'; सौंदर्याची परिभाषा बदलत मनीषा कोईरालाने शेअर केला ग्रे हेअर लूक

Prakash Raj : ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांना मातृशोक; आई स्वर्णलता यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

2026-03-30 17:35:12

Prakash Raj : ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांना मातृशोक; आई स्वर्णलता यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

Saba Azad Hospitalised: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद रुग्णालयात दाखल; चाहत्यांना केलं 'हे' आवाहन

2026-03-29 08:59:17

Saba Azad Hospitalised: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद रुग्णालयात दाखल; चाहत्यांना केलं 'हे' आवाहन