Manisha Koirala : “…इतकाच शृंगार पुरेसा असतो’; सौंदर्याची परिभाषा बदलत मनीषा कोईरालाने शेअर केला ग्रे हेअर लूक
Manisha Koirala : इन्स्टाग्रामवर तिचा ग्रे हेअर लूकमधील लेटेस्ट फोटो पोस्ट केला आहे. यात तिचे केस पांढरे झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे.

Manisha Koirala : अभिनेत्री मनिषा कोईरालाने 90चा काळ गाजवला. आपल्या अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर सिनेसृष्टीत तिने एक वेगळी ओळख निर्माण केली.
आता मनिषाने वयाची ५५ वर्ष पूर्ण केली आहे. परंतु, या वयातही तिने तिचा ग्लॅमरस अंदाज जपला आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांमध्ये तिच्या नवनवीन लूकची कायम चर्चा होत आहे.
अलिकडेच तिने इन्स्टाग्रामवर तिचा ग्रे हेअर लूकमधील लेटेस्ट फोटो पोस्ट केला आहे. यात तिचे केस पांढरे झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे. Manisha Koirala
”काही वेळ अशी असतो ज्यावेळी चमकून दिसण्यासाठी कोणत्याही खास कारणाची गरज लागत नाही. फक्त आपल्या आवडीचे दागिने आणि आनंदी मन इतकाच शृंगार पुरेसा असतो”, असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे. Manisha Koirala
View this post on Instagram
मनिषाच्या मते, हा बदल अचानक आलेला नाही, तर आयुष्यातील अनुभवांनी त्यांची विचारसरणी हळूहळू बदलली आहे. विशेषतः कॅन्सरसारख्या कठीण आजाराशी झुंज दिल्यानंतर मनीषासाठी सौंदर्याची व्याख्याच बदलली आहे.
आता ती सौंदर्य फक्त चेहरा किंवा लूकपुरते मर्यादित मानत नाहीत, तर त्यामध्ये मानसिक शांतता, जिद्द आणि दयाळूपणा यांचाही समावेश करते. तिचा हा अंदाज, वय वाढणे ही कोणतीही कमतरता नसून तो एक अनुभव आहे, जो अभिमानाने स्वीकारला पाहिजे, असा संदेश देतो.
मनिषा आजही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. मध्यंतरी ती ‘हिरामंडी’मध्ये झळकली होती. यातील तिच्या भूमिकेचे अनेकांकडून कौतुक करण्यात आले होते. त्यानंतर आता तिच्या या खास लुकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. Manisha Koirala
हेही वाचा:





