Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरने घेतलं अंबाबाईचं दर्शन! नतमस्तक होत केली प्रार्थना, व्हिडिओ व्हायरल
Shraddha Kapoor : बॅालीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने कोल्हापूरातील अंबाबाई मातेचे दर्शन घेतले असून, तिच्या साधेपणा चाहत्यांना भावला आहे.

Shraddha Kapoor : तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ या चित्रपटामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन छावा फेम दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर हे करत आहेत. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरमध्ये सुरू असून, अभिनेत्री श्रद्धा कपूरने अंबाबाई मातेचे दर्शन घेतले आहे.
सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, या व्हिडिओत श्रद्धा अंबाबाई मातेचे दर्शन घेत असल्याचे दिसत आहे. देवीसमोर नतमस्तक होत तिने देवीला साडी अर्पण केली. देवीचे दर्शन घेतल्यानंतर तिला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली होती. तिने यावेळी सर्वांना हात दाखवत प्रेमाने अभिवादन केले.
View this post on Instagram
प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता आनंद काळे कोल्हापूरचे असल्याने त्यांनीच श्रद्धा कपूर आणि ‘ईठा’ सिनेमाच्या टीमसाठी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाची व्यवस्था केली असल्याची शक्यता आहे. श्रद्धा कपूर बॅालीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून, तिचा साधेपणा चाहत्यांना नेहमीच भावतो. तिचा चाहतावर्ग मोठा असून तो नेहमी तिच्या आगामी प्रोजेक्टची वाट पाहत असतो.
ईठा या बहुचर्चेत चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकरत आहे. या भूमिकेसाठी तिने कठोर परिश्रम घेतले आहे. या चित्रपटात कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळणार आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘ईठा’ चित्रपटाचे चित्रिकरण अंतिम टप्प्यात आले आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरसह रणदीप हूडा, मोहम्मद झिशान अयुब हे लोकप्रिय कलाकारही झळकणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी २०२७ ला ‘ईठा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.





