Shraddha Kapoor : श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी
Shraddha Kapoor

Shraddha Kapoor : अभिनेत्री श्रद्धा कपूर ‘ईठा’ या सिनेमात लोकप्रिय तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ईठा’ सिनेमाच्या टीझरनंतर श्रद्धा कपूरच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. चाहते अभिनेत्रीला विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहे.
श्रद्धा कपूरच्या या सिनेमात ‘आई कुठे काय करते’ मधील मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे. अभिनेत्री राधा सागर ‘ईठा’मध्ये झळकणार नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबाबत राधा सागरने खुलासा केला.
राधा सागरने सांगितले की, “लक्ष्मण उतेकर यांच्या ‘ईठा’ सिनेमाचा भाग होण्याची संधी मला मिळाली. या चित्रपटात मी एक भूमिका केली आहे. मी ऑडिशन दिली, लुक टेस्ट झाली आणि सिलेक्टही झाले. पण या सिनेमात माझे श्रद्धा कपूरसोबत सीन नाहीत.
माझं सिनेमातलं जे कॅरेक्टर आहे, ती स्वतःचा ग्रुप घेऊन आलेली असते. मग आमच्यात स्पर्धा होते की काय होतं हे सिनेमात दिसेल. तिच्यासोबत माझे सीन्स नाहीत. पण आमची भेट झाली. ती फार गोड आहे. सिनेमा खूप कमाल आहे, नक्की बघा “, असेही तिने मुलाखतीत म्हंटले आहे.
‘ईठा’ सिनेमाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलं आहे. येत्या २८ ऑगस्टला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार होता. पण, यशच्या ‘टॉक्झिक’मुळे ‘ईठा’ सिनेमाची रिलीज डेट बदलण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
राधा सागरच्या कामाबद्दल सांगायचं तर तिनं ‘असे हे कन्यादान’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘आई कुठे काय करते’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.
हेही वाचा:
Rishabh Pant: “कृपया मदत करा, गेल्या 3 वर्षांपासून…” ऋषभ पंतची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची हाक






