कोपरगावच्या श्रध्दा होंडा शोरुमला लागली आग

Updated On:

कोपरगाव (प्रतिनिधी ): कोपरगाव शहरातील विशाल सरोदे व अशोक सरोदे यांच्या मालकीच्या श्रध्दा होंडा शोरुमला रविवारी शॉटसर्कीटने आग लागून शोरुमचे लाखो रुपयाचे नुकसान झाले मात्र यात सुदैवाने कोणतीही जीवीत हानी झाली नाही.

याबातची अधिक माहीत अशी कि रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान मोटारसायकल विक्री असलेल्या श्रध्दा होंडा शोरुमच्या सर्विस विभागात अचानक आगीसह धुराचे लोळ स्थानिक नागरीकांना दिसले.शोरुम मधील सोलर पॅनल, ऑईलचे डबे,फायबरचे साहीत्य मोटारसायकलीचे इतर साहीत्यांना आग लागल्याने आगीचा भडका होत होता. शोरुमच्या शेजारी नागरी वसाहत असल्याने सर्वांची पळापळ सुरु झाली. नागरीकांनी कोपरगाव नगरपालीकेच्या अग्निशामक दलाला आग लागल्याची माहीती कळविली.

अग्निशामक दलाचे अधिकारी संभाजी कार्ले यांनी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी तातडीने दाखल होवून स्वतःच्या जीवाची परवा न करता आगीच्या भाडकत्या ज्वाला चपळाईने शमविल्या. अग्निशामक दलाचे फायरमन कार्तीक मालकर,चेतन गव्हाणे,चालक संजय विधाते, प्रशांत शिंदे, यांचा त्यात मोलाचा वाटा आहे. नगरसेवक जनार्दन कदम, अनिरुद्ध काळे, वैभव गिरमे,सचिन खैरे,राजेंद्र बोरावके, विलास ताम्हाणे, राहुल जाधव,बल्लू पटेल, यांच्यासह स्थानिक नागरीकांनी विषेश मदत करून २० मिनिटात आग आटोक्यात आनल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दलाने थोडा जरी उशीर केला असता तर परिसरातील नागरी वस्तीसह शेजारच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले असते. शोरूमच्या शेजारी विलास ताम्हाणे यांच्या शेडचे या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान शोरुम सकाळी उघडण्यि पुर्वी ही आग लागली कोणीही कर्मचारी तेथे नसल्याने जीवीत हानी झाली नाही. यात अनेक मोटारसायकलीच्या नव्या स्पेअरपार्टसह ऑईलचे बंद डबे, फर्निचर, सीसीटीव्ही, गाड्यांच्या पेट्रोल टाक्या, महत्वाची कागपत्रे, संगणक प्रणालीचे मोठ्या प्रमाणात आगी मध्ये जळून खाक झाल्याने नुकसानीचा आकडा सांगता येत नाही अशी माहीती शोरुमचे प्रमुख विशाल सरोदे यांनी दिली आहे.पोलीसांनी घटनास्थळी पाहाणी करुन अकस्मात जळीतचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास करीत आहेत.

करोनाच्या भितीने व लॉकडाउमुळे सर्वच व्यवसायीकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. दोन महीण्यापासुन मोटारसायकल विक्री व दुरुस्ती व्यवसाय ठप्प आहे. नविन गाड्या साहीत्य विक्री अभावी धूळखात पडले आहे. दोन महीण्यानंतर थोड्या प्रमाणात व्यवहार सुरु होत असताना सरोदे कुटुंबाला आगीच्या रुपातुन पुन्हा मोठे नुकसान झाल्या बद्दल नागरीकामधुन हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune District : विड्याच्या पानांची २,१०० डागांची विक्रमी आवक

2026-10-08 07:37:51

Pune District : विड्याच्या पानांची २,१०० डागांची विक्रमी आवक

Indapur : दुष्काळावर उपाययोजण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार

2026-10-08 07:28:41

Indapur :  दुष्काळावर उपाययोजण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार

Pune District : शेततळ्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

2026-10-07 10:29:35

Pune District : शेततळ्यात बुडून दहा वर्षीय मुलीचा मृत्यू

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

2026-10-07 08:32:01

Pune District : सोमेश्‍वरच्या शिवारात जगतापांपुढे आव्हान

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव

2026-10-07 08:25:57

Chakan : चाकणच्या वाहतूक कोंडीला नियोजनाचा अभाव