Pune District : चासकमान कालव्यातून रब्बी आवर्तन सुरू
Pune District : यंदा पावसाचे प्रमाण, धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि शेतीची गरज लक्षात घेता पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन शेतकर्यांनी उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळावा आणि आवश्यकतेनुसारच पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांना पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यातून शनिवारी (दि. 21) सायंकाळी पाच वाजता रब्बी आवर्तन सुरू करण्यात आले. सुरुवातीला 100 क्युसेक वेगाने सोडण्यात आलेला विसर्ग वाढवून आता 200 क्युसेक करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती धरणाचे सहाय्यक अभियंता प्रणव गावडे यांनी दिली.
यंदा पावसाचे प्रमाण, धरणातील उपलब्ध पाणीसाठा आणि शेतीची गरज लक्षात घेता पाण्याचे काटेकोर नियोजन करणे आवश्यक आहे. दुष्काळी परिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन शेतकर्यांनी उपलब्ध पाण्याचा अपव्यय टाळावा आणि आवश्यकतेनुसारच पाणी वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, कालव्यात पाणी सोडण्यात आल्याने लाभक्षेत्रातील शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आवर्तन किती दिवस चालणार, याबाबत अनिश्चितता कायम असल्याने शेतकर्यांचे लक्ष प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
वरिष्ठांच्या आदेशानुसार डाव्या कालव्यातून 200 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, हे आवर्तन किती दिवस सुरू ठेवायचे, याबाबत अद्याप निश्चित कालावधीचा आदेश प्राप्त झालेला नाही. उपलब्ध पाणीसाठा, पुढील परिस्थिती आणि वरिष्ठांच्या निर्देशांनुसार आवर्तनाचा कालावधी निश्चित केला जाणार आहे.
-प्रणव गावडे, सहाय्यक अभियंता





