Manwa Naik : देशात ईव्ही कार आल्यापासून अनेकांनी सुरूवातीला या कारला पसंती दर्शवली नाही. मात्र, काही कालावधी गेल्यानंतर ईव्ही कार खरेदी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. पण काही घटना समोर आल्यानंतर ईव्ही कार खरेदी करावी का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मनवा नाईक हिला ईव्ही कारचा आलेला भयानक अनुभव तिने तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

सहा महिन्यात अनेकवेळा गाडी बंदी पडली म्हणत मनवाने संताप व्यक्त केला आहे. तसेच तिने कार खरेदी करताना जागृक राहण्याचं आवाहन केलं आहे. अभिनेत्री मनवा नाईक सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती नेहमी चाहत्यांना वैयक्तिक आणि करिअरमधील अपडेट देत असते.

मनवाने व्हिडीओ शेअर करत तिने खरेदी केलेल्या टाटा कंपनीच्या कारचा वाईट अनुभव शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने काही महिन्यांपूर्वी घेतलेली टाटा कंपनीची नवीकोरी ईव्ही कार सतत बंद पडत असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय वारंवार तक्रार करुनही अपेक्षित उत्तर मिळत नसल्याचं तिने व्हिडीओत म्हटलं आहे.

काय म्हणाली मनवा नाईक?

माझा एक भयानक अनुभव मी तुम्हाला आता सांगणार आहे. माझ्याकडे टाटाची nexon Ev ही गाडी आहे. आणि आहे का होती म्हणावं मला कळत नाहीये. कारण गेल्या ६ महिन्यांमध्ये ती गाडी टाटाच्या वर्कशॉपला वारंवार जात आहे. कारण दर वेळेला ४-५ दिवसांनी ती बंद पडते. तिचा गिअर अडकतो. त्याची बॅटरी बिघडते…आणि नवीन गाडी आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manava Arun Naik (@manava.naik)

मी टाटा मोटर्स, नेक्सन, ज्यांच्याकडून मी गाडी घेतलेली अशा सगळ्यांना इमेल पाठवून झाले आहेत. परंतु त्यांच्याकडून जो रिझल्ट अपेक्षित होता तो मिळाला नाही. त्याबद्दल मी नाराज आहे. सहा महिन्यात सहा वेळा गाडी बंद पडली. गिअर अडकतो… रस्त्याच्या मध्ये गाडी बंद पडते. एकदा तर D गेअरवरच बंद पडली. त्यामुळे मी फक्त सरळच जाऊ शकत होते. मला आता काळजी वाटत आहे, असं मनवाने म्हटलं आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांचे अनुभवही शेअर केले आहेत.

हेही वाचा:  Dashavatar: ‘दशावतार’ चित्रपटावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया; सामाजिक विषयाचं कौतुक