Pune News : पुणे शहरातील दुकाने आणि आस्थापना २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी; पण ‘हे’ व्यवसाय रात्री १० वाजताच बंद होणार
Pune News : खाऊ गल्ल्या 10 वाजताच बंद : व्यापाऱ्यांच्या प्रश्नासाठी नोडल ऑफिसर

Pune News : पुणे शहरातील सर्व अधिकृत आणि परवानाधारक दुकाने तसेच आस्थापना कायद्यानुसार २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी असल्याचे स्पष्ट करत पुणे पोलिसांनी व्यापारी वर्गातील संभ्रम दूर केला आहे. मात्र खाऊ गल्ल्या नियमाप्रमाणे 10 वाजताच बंद होतील असेही निदर्शनास आणून दिले आहे.
व्यापारी वर्गाच्या विविध समस्या, दुकाने आणि आस्थापनांच्या वेळांबाबत निर्माण झालेला संभ्रम, पोलिसांकडून होणारी अंमलबजावणी, तसेच व्यापारी आणि पोलिस प्रशासन यांच्यात अधिक प्रभावी समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशाने पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात विशेष समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते यांच्यासह भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष महेश गुप्ता आणि विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. (Pune News)
हातगाडी व्यावसायिक, फेरीवाल्यांना रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी (Pune News)
बैठकीदरम्यान पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, शहरातील सर्व परवानाधारक दुकाने व आस्थापने २४ तास व्यवसाय सुरू ठेवू शकतात. मात्र टपऱ्या, हातगाडी व्यावसायिक, फेरीवाले, पानटपऱ्या आणि तत्सम व्यवसायांना रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी राहील.
या निर्णयामुळे शहरातील विविध भागांत दुकाने सुरू ठेवण्याच्या वेळांबाबत असलेला संभ्रम दूर झाला असून, अंमलबजावणीत एकसमानता येण्यास मदत होणार आहे. व्यापारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. (Pune News)

Pune News : पुणे शहरातील दुकाने आणि आस्थापना २४ तास सुरू ठेवण्यास परवानगी; पण ‘हे’ व्यवसाय रात्री १० वाजताच बंद होणार
याशिवाय व्यापाऱ्यांच्या तक्रारी व समस्यांचे जलद निवारण करण्यासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर नियुक्त करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे व्यापारी वर्ग आणि पोलिस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक प्रभावी होऊन व्यापाऱ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत व्यापारी हित जपण्यासाठी पोलिस प्रशासन आणि व्यापारी संघटना संयुक्तपणे काम करतील, असेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.व्यापारी संघटनांनी पुणे पोलिसांच्या सकारात्मक भूमिकेचे स्वागत करत आभार मानले. (Pune News)
हेही वाचा:





