टोईंग व्हॅनचा धक्कादायक कारनामा: पुण्यात दुचाकीस्वार ४ फूट हवेत! गुलटेकडी भागातील घटना; अरेरावी कधी थांबणार?

Pune | नुकताच पुण्यातील कोंढवा परिसरातील चुकीच्या दिशेने जाणाऱ्या टोईंग वाहनावर पुणे पोलिसांनी दंडात्मक करावाई केली होती. यानंतर अनेकांकडून टोईंग व्हॅनवर असणाऱ्यांकडून वाहन चालकाला अरेरावीची भाषा कधी थांबणार असा प्रश्न विचारण्यात येत होता. आता पुण्याात नो-पार्किंगमधील दुचाकी क्रेनद्वारे उचलून वर ठेवताना दुचाकीस्वारालाही तीन ते चार फुटांपर्यंत उचलल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
चालकाने जागेवर दंड भरतो गाडी उचलून का, अशी विनवणी करून गाडी उचलण्यास अटकाव केल्यानंतरही गाडी उचलण्यात आली. यावेली दुचाकीस्वाराचा हात क्रेनच्या पट्ट्यात अडकल्याने दुचाकीस्वार गाडीसोबत धोकादायकरित्या अचलला गेला. यात त्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. दुचाकीस्वाराने ही घटना सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. काल दि. २८ मार्च रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गुलटेकडी परिसरात ही धक्कादायक घटना घडली.
नेमकं घटना कशी घडली?
शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गुलटेकडी परिसरातील एका ठिकाणी संबंधित दुचाकीस्वाराने आपली दुचाकी पदपथावर पार्क केली होती. त्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांची क्रेन आली. टोईंन व्हॅनमधील पोलिस कर्मचाऱ्याने सांगितल्यानंतर कर्मचाऱ्याने गाडी क्रेनपर्यंत ढकलत नेली. यावेळी तिथे आलेल्या दुचाकीस्वाराने आपली चूक मान्य केली. तसेच जो काही दंड असेल तो जागेवर भरतो, असे सांगितले.
मात्र, क्रेनवरील कर्मचाऱ्याने दुचाकीस्वाराचे काहीही न ऐकता दुचाकी उचलण्यास सुरुवात केली. यावेळी दुचाकीस्वाराने त्याला विरोध केला. तरीही कर्मचाऱ्याने गाडी उचलली. यावेळी दुचाकीस्वाराचा हँन्डल आणि पट्टीमध्ये हात अकडला आणि संबंधित व्यक्ती ३ ते ४ फुट उंच उचलली गेली. यावेळी दुचाकीस्वारीने आरडाओरडा केल्यानंतर क्रेनचालकाने त्यांना खाली उतरले. यामध्ये दुचाकीस्वाराच्या हाताला दुखापत झाली.
या घटना थांबणार तरी कधी?
दुचाकी, चारचाकी वाहने नोपार्किंगमध्ये लावल्या जातात. अी वाहनने टोईंग व्हॅन येूऊन घेऊन जाते. यानंतर संबंधित वाहन मालकाला पोलिस चौकीत जाऊन दंड भरावा लागतो. अनेकदा वाहन चालक आणि टोईंग व्हॅनवरील कर्मचारी यांच्यासोबत बाचाबाजीचे प्रकार घटतात. तसेच कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून वाहन चालकाला अरेरावीची भाषा वापरली जाते. आता हे प्रकार कधी थांबणार असा प्रश्न विचारला जात आहे.





