धक्कादायक.! बीडमध्ये बस कर्मचाऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
Updated On:

बीड – महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या ऑक्टोबरच्या अखेरपासून संप पुकारला आहे. राज्यातील काही आगारांमध्ये संप अद्यापही सुरू असून, संचलन ठप्प आहे.
दिवसेंदिवस राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणखी चिघळला आहे. बीड येथे एसटी बस चालकाने विषारी औषध घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. अशोक कोकटवार असं या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. सध्या या चालकाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.





