धक्कादायक.! अल्पवयीन मुलावर तरुणीचा अत्याचार

पुणे – अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणीविरुद्ध कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार एका वर्षीय तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी तरुणीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (पोस्को) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा आणि तरुणी शेजारी आहेत.
तरुणीने मुलाला जाळ्यात ओढून माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तु माझ्यावर बलात्कार केला, अशी तक्रार पोलिसांकडे देईल, अशी धमकी अल्पवयीन मुलाला दिली होती.
त्यानंतर तरुणीने अल्पवयीन मुलाला धमकावून त्याच्याशी संबंध जोडले. अल्पवयीन मुलाला मोबाइल कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास सांगितले. तरुणीच्या धमक्यांमुळे अल्पवयीन मुलाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक बाबर तपास करत आहेत.





