धक्कदायक! ‘जय श्री राम’चा देण्यास सांगत टोळक्याकडून मुस्लीम तरुणाला मारहाण; जिग्नेश मेवानींनी केला शेअर व्हिडीओ

नवी दिल्ली : मागच्या काही दिवसांपासून देशात सांप्रदायिक हिंसा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. हरियाणामध्ये अशाच प्रकारची हिंसा सध्या सुरु असताना दुसरीकडे गुजरातमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. ‘जय श्री राम’चा नारा देण्यास सांगत एका मुस्लीम तरुणाला टोळक्याने मारहाण केली आहे. याबाबतचा व्हिडीओ आमदार जिग्नेश मेवानी यांनी शेअर केला आहे. याबद्दल पोलीस महासंचालकांना भेटून आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे जिग्नेश मेवानी यांनी सांगितले आहे.
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील दिओदर तहसील परिसरात ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे या व्हिडीओत तीन तरुण एकाला ‘जय श्रीराम’चा नारा देण्यास सांगत असल्याचे दिसत आहे. जोपर्यंत ‘जय श्री राम’ म्हणत नाही, तोपर्यंत त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे. २२ जुलै २०२३ चा हा व्हिडीओ असल्याचा दावा करण्यात येत आहे.
यह दो वीडियो हमारे महान, प्रगतिशील गुजरात के बनासकांठा ज़िले के दिओदर तहसील की है जहां एक मुस्लिम युवक (जो “भैंस लेकर जा रहा था) को तथाकथित गौ रक्षकों द्वारा तब तक पीटा गया जब तक उस के मुंह से जय श्रीराम का नारा नही निकला।
कल इस मामले में प्रदेश के डीजीपी से मुलाकात करेंगे और… pic.twitter.com/sms0ZOjVCQ— Jignesh Mevani (@jigneshmevani80) August 3, 2023
याबाबत जग्नेश मेवानी यांनी ट्वीट केले आहे. त्या ट्वीटमध्ये जिग्नेश मेवानी यांनी, “हे दोन व्हिडीओ आमच्या प्रगतशील गुजरातमधील बनासकांठ जिल्ह्यातील दिओदर तहसील येथील आहेत. यात एका मुस्लीम तरुणाला ( गुरांना चारण्यासाठी जात होता ) तथाकथित गो-रक्षकांनी मारहाण केली आहे. जय श्री राम बोलत नाही, तोपर्यंत या तरुणाला मारहाण करण्यात आली.”
“याप्रकरणी गुजरातचे पोलीस महासंचालक यांची भेट घेत आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे,” असेही जिग्नेश मेवानी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.




