धक्कादायक….किडलेल्या दातांमुळे हुकले अंतराळवीर होण्याचे स्वप्न

नवी दिल्ली : अंतराळात जाऊन ग्रहतारे स्वत: अनुभवण्याचा संधी जगातील प्रत्येकालाच यावी असे वाटत असते. त्यातील काही जणांचे स्वप्न खरे होते तर काहींच्या स्वप्नांना काही कारणाने ब्रेक लागतो. मात्र यासर्वांमध्ये हातात आलेली संधी जर निसटून गेली तर….होय अशीच एक घटना घडली आहे. दात किडल्याने अनेकांचे अंतराळवीर होण्याचे स्वप्न भंगले असल्याचे सांगण्यात येत आहे.
इन्स्टिट्युट ऑफ एअरोस्पेस मेडिसिनला नवा धडा मिळाला आहे आहे. 12 टेस्ट पायलट्सच्या भरतीदरम्यान ही गोष्ट IAM ला शिकण्यास मिळाली आहे. रशियातील तज्ज्ञांच्या मदतीने गेल्या 45 दिवसांमध्ये रशियातील युरी गागारीन कॉस्मो ट्रेनिंग सेंटरमध्ये अंतराळवीरांसाठी एक प्रशिक्षण शिबीर पार पडले. आता रशियात प्रशिक्षणासाठी गेलेला हा चमू लवकरच परतणार आहे.
गगनयान या मोहिमेसाठी अंतराळवीर निवडण्यासाठी एकूण 60 जण पात्र ठरले होते. त्यापैकी 12 जणांची निवड टेस्ट पायलट म्हणून करण्यात आली. मात्र ज्या 12 जणांची निवड झाली नाही त्यापैकी 48 अनेकांना दात किडल्याची, दात खराब असल्याची समस्या सतावत होती. निव्वळ या एका कारणामुळे त्यांचं अंतराळवीर होण्याचं स्वप्न भंगलं.




