Shoaib Akhtar Reaction : “बेट्यांनो, अशीच आक्रमकता दाखवत राहा…पण…”, अंडर-19 टीम इंडियाच्या सेलिब्रेशनवर शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
Shoaib Akhtar Reaction : भारतीय युवा संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर अवघ्या १ गडी राखून थरारक विजय मिळवल्यानंतर आक्रमक सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने प्रतिक्रिया दिली आहे.

Shoaib Akhtar Reaction IND vs PAK U19 Asia Cup 2026 Final Aggressive Celebration : १९ वर्षांखालील आशिया चषक २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर अवघ्या १ गडी राखून थरारक आणि ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्यात एका क्षणी भारताची अवस्था अत्यंत बिकट झाली होती; मात्र तळाच्या फलंदाजांनी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज देत अशक्यप्राय वाटणारा सामना जिंकून दिला. या दणदणीत विजयानंतर भारतीय युवा खेळाडूंनी मैदानावर केलेल्या आक्रमक सेलिब्रेशनची सर्वत्र चर्चा रंगली असताना, आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
‘मला तुमची आक्रमकता आवडली’; शोएब अख्तरने केले टीम इंडियाचे कौतुक
‘पीटीव्ही स्पोर्ट्स’शी संवाद साधताना शोएब अख्तरने विजयाबद्दल भारतीय युवा संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले. भारतीय खेळाडूंच्या मैदानावरील आक्रमक वृत्तीचे कौतुक करताना अख्तर म्हणाला, “भारतीय युवा खेळाडूंना माझा हाच संदेश आहे की, बेट्यांनो अशीच आक्रमकता दाखवत राहा. मला तुमची ही आक्रमक शैली खूप आवडली.”
पाकिस्तानचा संघ सरस होता, पण दबावापुढे शरणागती पत्करली
Shoaib Akhtar – “Beta show aggression but Pakistan were a far superior team throughout the tournament.”
The reason Pakistan ranks above India on the Happiness Index 😭😂 https://t.co/7BCxYA3pbM
— 𝐉𝐨𝐝 𝐈𝐧𝐬𝐚𝐧𝐞 (@jod_insane) November 15, 2026
Just look At Team India Celebrations After defeating Pakistan 🔥🔥🔥🔥 https://t.co/vPFjDDboa6
— Vivek (@vivek199928) November 14, 2026
मात्र, आपल्या संघाची बाजू मांडताना अख्तरने असेही नमूद केले की, संपूर्ण स्पर्धेत आणि अंतिम सामन्यातही पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा सरस खेळला. परंतु, निर्णायक क्षणी पाकिस्तानी खेळाडूंना दबाव हाताळता आला नाही; याउलट कठीण प्रसंगी दबावाचा सामना कसा करायचा, हे भारतीय संघाला नेहमीच चांगले ठाऊक असते, अशी कबुली त्याने दिली.
२०२५ च्या पराभवाचा वचपा काढत भारताने आकडेवारीतही घेतली आघाडी –
Shoaib Akhtar’s message to young Indian Players. 🗣️
“Beta, show your aggression, I liked it. But Pakistan were a far superior side and much better throughout the tournament. Somehow, they failed to handle the pressure. As always, India know how to deliver in crunch moments.” https://t.co/564qfm7LrZ
— Hamza Khan (@HamzaKhan17__) November 15, 2026
अंडर-१९ एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत १९८८ पासून ३२ वेळा आमनेसामने आले असून, भारताने १७ तर पाकिस्तानने १५ सामने जिंकले आहेत. या विजयासह भारताने २०२५ मधील पराभवाचा हिशोबही चुकता केला आहे.





