Maharashtra politics : ठाकरेंच्या खासदाराने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट; राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra politics : शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली.

Maharashtra politics : शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरेसेनेसह राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Maharashtra politics )
काल मुंबईत मातोश्रीवर झालेल्या शिवसेनेच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीला संजय देशमुख अनुपस्थित होते. बैठकीला दांडी मारल्यानंतर थेट दुसऱ्याच दिवशी सत्ताधारी महायुतीतील मंत्र्यांसोबतची त्यांची भेट राजकीय चर्चांना वाव देणारी ठरली. (Maharashtra politics )
संजय देशमुख यांच्या या दिल्ली भेटीने ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या सर्व चर्चांना पूर्णविराम लावण्यासाठी खासदार देशमुख यांनी स्वतःहून उद्धव ठाकरे यांना फोन केला. आपल्या मतदारसंघातील एका महाविद्यालयाच्या मंजुरीचे महत्त्वाचे काम प्रलंबित होते. (Maharashtra politics )
याच शैक्षणिक कामाच्या तातडीच्या मंजुरीसाठी आपण केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. ही भेट केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी असून यात कोणताही राजकीय हेतू नाही, असा खुलासा करत त्यांनी आपण पक्षाशी पूर्णपणे बांधील असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले (Maharashtra politics )

सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीला अनुपस्थित राहण्यामागे कौटुंबिक कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते आणि आता दिल्लीतील भेटीचा खुलासा करून त्यांनी सर्व संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. (Maharashtra politics )





