Sanchita Ugale Death : अभिनेत्री संचिता उगले मृत्यू प्रकरणाला नवं वळण? चुलत भावाचा मोठा दावा; ’14 जून’चं सुशांत सिंह राजपूतशी जोडले कनेक्शन
Sanchita Ugale Death : २२ वर्षीय लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेत्री संचिता उगले हिच्या मृत्यू प्रकरणाला आता एका नव्या दाव्यामुळे अत्यंत रहस्यमय वळण मिळाले आहे.

Sanchita Ugale Death : अभिनेत्री संचिता उगलेच्या मृत्यूप्रकरणात आता नवे दावे समोर येऊ लागले आहेत. 14 जून रोजी नालासोपाऱ्यातील राहत्या घरी गळफास घेतलेल्या संचिता उगलेच्या मृत्यूनंतर तिच्या चुलत भावाने काही गंभीर आरोप केले असून, या घटनेचा संबंध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तारखेशी जोडण्याचा दावा केला आहे. (Sanchita Ugale Death)
संचिताचा चुलत भाऊ आकाश सतीश उगले याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, संचिताच्या मृत्यूनंतर त्याला एका इन्स्टाग्राम अकाउंटची माहिती मिळाली. त्या अकाउंटवर संचिता उगलेचा प्रोफाइल फोटो असल्याचा दावा करत, त्यावर 14 जूनचा उल्लेख असलेली एक रील पोस्ट करण्यात आल्याचे त्याने सांगितले. (Sanchita Ugale Death)
त्याच्या म्हणण्यानुसार, त्या रीलमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या व्हिडिओ क्लिप्स वापरण्यात आल्या असून, त्यावर “It’s again 14th June” असा मजकूर दिसत आहे. तसेच कॅप्शनमध्ये “We miss you, Sushant Sir” असा उल्लेख असल्याचे त्याने सांगितले. सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू 14 जून 2020 रोजी झाला होता, तर संचिता उगलेचा मृत्यू 14 जून 2026 रोजी झाल्याने या तारखेच्या साम्याबाबत त्याने प्रश्न उपस्थित केला आहे. (Sanchita Ugale Death)
‘हे माझ्या बहिणीचं अकाउंट होतं’
आकाश उगलेने संबंधित इन्स्टाग्राम अकाउंट हे संचिता उगलेचंच असल्याचा दावा केला. हे अकाउंट नुकतेच तयार करण्यात आले असून, त्यावरील पहिली पोस्ट 2 जून रोजी अपलोड झाल्याचे त्याने सांगितले. या अकाउंटवरील पोस्ट आणि त्यातील मजकुराची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्याने केली. (Sanchita Ugale Death)
मनोरंजन क्षेत्रावर आरोप
यावेळी आकाश उगलेने मनोरंजन क्षेत्रावरही गंभीर आरोप केले. मध्यमवर्गीय कुटुंबातील कलाकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि त्यांच्यावर दबाव आणला जातो, असा दावा त्याने केला. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य बाहेर यावे, अशी मागणीही त्याने केली. (Sanchita Ugale Death)
पोलीस तपास सुरू
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून, घटनास्थळावर कोणतीही सुसाईड नोट आढळलेली नाही. संचिता उगलेच्या मृत्यूमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. सध्या तिच्या कुटुंबीयांनी केलेल्या दाव्यांचीही पडताळणी केली जात असून, अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. (Sanchita Ugale Death)





