अमित शाह यांनी दिलेला शब्द मोडला; शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा आरोप

लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गट आणि भाजपामधील अंतर्गत वाद हळूहळू समोर येताना दिसत आहेत. यामुळे काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीवर याचा परिणाम होऊ शकतो. यादरम्यान अमरावतीमधील शिवसेना शिंदे गटाचे नेते अभिजीत अडसूळ यांनी भाजप तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर आरोप करत जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले अभिजीत अडसूळ?
अमरावतीची जागा मूळ शिवसेनेची होती. आनंदराव अडसूळ यांची लोकसभेवर अमरावतीच प्रतिनिधीत्व केलय. लोकसभा निवडणुकीत यावेळी शिवसेनेने ही जागा भाजपासाठी सोडली. भाजपाने इथून नवनीत राणा यांना तिकीट दिलं होतं. त्यांचा पराभव झाला. ही जागा सोडण्याच्या बदल्यात माझ्या वडिलांना अमित शाह यांनी राज्यपाल बनवण्याच आश्वासन दिलं होतं असा दावा अभिजीत अडसूळ यांनी केला आहे.अमित शाह यांनी माझ्या वडिलांना राज्यपाल बनवण्याचे आश्वासन दिले होते. लेखी आश्वासन दिले होते, वडिलांना याचा प्रचंड राग आहे असे अभिजीत अडसूळ म्हणाले आहेत.
‘आमच्यावर अन्याय झाला’
या संदर्भात “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आम्ही चर्चा करणार आहोत. अमित शाहंच्या विनंतीवरून आम्ही अमरावतीची जागा सोडली. आम्ही मिळून प्रवीण दरेकर यांना बँकेचे अध्यक्ष केले. आमच्यावर अन्याय झाला आहे” असं अभिजीत अडसूळ म्हणाले आहेत.





