Shivjayanti 2022 : हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी तर, बाईक रॅली; मनसेकडून अशी साजरी होणार शिवजयंती

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराजांची आज 21 मार्च रोजी राज्यभर तिथीने जयंती साजरी केली जात आहे. या निमित्ताने शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या जुन्नर मधील किल्ले शिनेरीवर मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित झाले आहे.
तर, दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सुद्धा शिवजयंतीची जोरदार तयारी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवजयंती जोरात आणि उत्साहात साजरी करावी असं सांगितलं होत.
सकाळी 10.30 वाजता सुमारास शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. तसेच, दादरमध्ये महिलांची रॅली मोठी निघणार आहे. यापूर्वी शिवसेना तिथीनुसार शिवजयंती कजरी करत होती.
मात्र, आता हीच शिवजयंती गेल्या काही वर्षांपासून मनसे अतिशय दणक्यात आणि उत्साहात साजरी करत आहे. दरम्यान,शिवजयंतीच्या या सोहळ्यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त, मनसेचे नेते, सरचिटणीस, प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.





