Shivendrasinhraje Bhosale : शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा’; शिवेंद्रसिंहराजेंचा प्रशासनाला कडक आदेश
Shivendrasinhraje Bhosale : कुमठ्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते विविध दाखल्यांचे आणि कृषी साहित्याचे वाटप; प्रशासनाला दिले जनतेचे प्रश्न सोडवण्याचे कडक निर्देश.

Shivendrasinhraje Bhosale – राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून. त्यांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवावे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने काम करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत कुमठे, ता. सातारा येथे झालेल्या शिबिरात लाभार्थ्यांना शासकीय लाभांचे,
साहित्याचे व दाखल्यांचे वाटप ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या पूजा मोरे, पंचायत समितीचे सभापती महेश गाडे, सदस्या प्रमिला सुतार, कोमल दळवी, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, अरुण कापसे, सुरेंद्र देशपांडे, अरविंद चव्हाण, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन नामदेव सावंत, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक तुषार पाटील, कृषी विभागाचे ढगे उपस्थित होते.
याप्रसंगी आष्टे येथील पुनर्वसित गावठाणातील भूधारण प्रकार वर्ग 2 चे वर्ग 1 करून 105 लाभार्थ्यांना सातबारा व फेरफार वाटप, कातकरी दाखले 51, संजय गांधी निराधार योजना 15, श्रावण बाळ योजना 10, अपाक कमी करणे 9, लक्ष्मीमुक्ती योजना 2, वारसनोंदी 56, एकुमॅ नोंदी कमी करणे 5, सातबारा दुरुस्ती 7, डिजिटल रेशनकार्ड 240, शाळकरी मुलांचे अधिवास प्रमाणपत्र 405,
बोजा कमी करणे 5, आरोग्य तपासणी 60, नेत्र तपासणी 119, कृषी विभागांतर्गत ट्रॅक्टर व अवजारे 26, आधारकार्ड नोंदणी व दुरुस्ती 47, एसटी महामंडळाच्या महिला सन्मान योजनेंतर्गत पासेस 142, एकात्मिक बालविकासमार्फत बेबी केअर किट 35, कॅनरा बँक सीएसआर फंडातून सायकल 12, भूमी अभिलेख विभाग 15, पशु वैद्यकीय विभागांतर्गत जंतुनाशक गोळ्या 56, जिल्हा बँक 10 तर वन विभागाशी संबंधित चार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले.





