Shivena Opration Tiger । राज्यातील विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाची साथ अनेकांनी सोडली. त्यासोबतच अजूनही अनेकांना त्यांच्या राजकीय भविष्याची चिंता सतावत आहे. दरम्यान ठाकरे गटात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरेंकडील 6 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्यात शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा रंगली आहे. ऑपरेशन टायगरमध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे. याचदरम्यान शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची तयारी आता पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत समोर आलं आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार येत्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी संसदेच्या अधिवेशनाआधी ही मोहीम फत्ते करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा ही अनेक दिवसांपासून होती. पण खासदाराचे काही निश्चित होत नव्हते कारण पक्षांतर बंदी कायदा आडवा येत आहे. या कायद्यातून वाचायचं असेल तर ठाकरेंचे नऊ पैकी सहा खासदार फुटणं आवश्यक होतं. अन्यथा फुटीर गटावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकत होती. त्यामुळे पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी 6 खासदारांचा आकडा महत्वाचा होता. त्यामुळे एकूणच खासदारांचे मन वळवण्यासाठी देखील वेळ घेतला गेला. अशात, अखेर 6 खासदारांचे मन वळवण्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला यश आले असून पडद्यामागं पूर्णपणे जुळणी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ठाकरे गटाचे काही आमदारही संपर्कात Shivena Opration Tiger । सहा खासदार शिंदे गटात जाण्यास तयार असून लवकरच पक्ष प्रवेश होणार असल्याचं कळतंय. याला भाजपची देखील शिंदेंना साथ असल्याचे म्हटले जात आहे. यासोबतच, काही आमदार देखील संपर्कात असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप यासंदर्भात निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. खासदारठाकरे गटाची साथ का सोडणार ? Shivena Opration Tiger । – पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्याने अनेक खासदारांना आपल्या भविष्याची चिंता…प्रामुख्याने निधी मिळवण्यासाठी अडचण…केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सरकार महायुतीचं असल्याने त्याचा फायदा – पक्ष आणि चिन्हासंदर्भातला मुद्दा गौण…प्रमुख कारण म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं निवडणूक लढली आणि लोकांनी त्यांना स्विकारलं. सोबतच, विधानसभा निवडणुकीत त्याची प्रचिती आली. शिवसेनेला मोठा विजय…अशात, पक्ष आणि चिन्हाचा मुद्दाच उरलेला नाही. – केंद्रात भाजपची साथ असल्याने विकास कामांना गती मिळण्यास मदत…सोबतच, निधी मिळण्यास अडचणी नाहीत. हेही वाचा Ajit Pawar : आमदार महेश लांडगेंच्या ‘त्या’ मागणीला अजितदादांनी दिला नकार म्हणाले, तूर्तास तरी…..; पाण्याच्या समस्येवरही केले भाष्य