Shivam Dube Video : ‘हा व्हिडिओ डिलीट करा!’ शिवम दुबेने पॅपराझीला केली विनंती; म्हणाला, ‘माझी बायको येतेय…’, पाहा VIDEO
Shivam Dube Video : आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shivam Dube Viral Video : टी-२० विश्वचषक २०२६ च्या विजयानंतर भारतीय खेळाडूंचे ठिकठिकाणी जंगी स्वागत होत आहे. मात्र, स्टार ऑलराउंडर शिवम दुबेने चाहत्यांच्या गराड्यापासून वाचण्यासाठी आणि आपल्या दोन चिमुकल्यांना लवकरात लवकर भेटण्यासाठी एक अनोखा मार्ग निवडला. ज्यामुळे तो चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पॅपराजींसोबतचा ‘तो’ मजेशीर व्हिडिओ व्हायरल –
मुंबईत आपल्या घराबाहेर फोनवर बोलत असताना दुबेला पॅपराजींनी (फोटोग्राफर्स) गाठले. अचानक समोर कॅमेरा पाहून दुबे थक्क झाला आणि सौम्य स्वरात म्हणाला, “भावा, तुम्ही इथे काय करत आहात? माझी पत्नी येत आहे, तिच्यासोबत व्हिडीओ बनवून घ्या.” शेवटी हसत हसत त्याने विनंती केली की, “भावा, तो व्हिडिओ डिलीट करून टाक!”
Shivam Dube was waiting for his wife outside a building and someone started recording his video.
Instead of getting angry, he was politely requesting the guy to delete the video.
Bro plays international cricket for India and is still so humble and innocent. 😭😭 pic.twitter.com/QML3S3Xy9d— 𝚅𝚊𝚛𝚞𝚗¹⁸ (@varunx18) March 15, 2026
एसी थ्री-टियरमधून प्रवास करत गाठली मुंबई –
यापूर्वी अहमदाबादमधील अंतिम सामन्यानंतर मुंबईसाठीची सर्व विमाने हाऊसफुल्ल असल्याने, दुबेने चक्क ‘सयाजी नगरी एक्सप्रेस’ने एसी थ्री-टियरमधून प्रवास करत मुंबई गाठली. यावेळी ३२ वर्षीय शिवम दुबेने पहाटे ५:१० वाजता ट्रेन पकडताना आपली ओळख लपवण्यासाठी टोपी, मास्क आणि पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट घातला होता. प्रवासादरम्यान टीसीला आरक्षण यादीत नाव पाहून शंका आली, मात्र दुबेची पत्नी अंजुम हिने अतिशय हुशारीने परिस्थिती हाताळली.
ती म्हणाली, “एवढा मोठा क्रिकेटर ट्रेनने कशाला प्रवास करेल?” असे म्हणत तिने सर्वांचे लक्ष भरकटवले. ८ तासांच्या या प्रवासात दुबे वरच्या सीटवर आराम करत होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये. यानंतर दुपारी १ वाजता बोरीवली स्थानकावर उतरताना चाहत्यांची गर्दी होऊ नये, यासाठी दुबेने आधीच पोलिसांकडे मदत मागितली होती. साध्या वेशातील पोलिसांनी त्याला गर्दीतून सुरक्षितपणे बाहेर काढत त्याच्या गाडीपर्यंत पोहोचवले.





