Shivam Dube : ‘…म्हणून फ्लाईट सोडून प्रवासासाठी ट्रेन पकडली’, विश्वविजेत्या शिवम दुबेने केला खुलासा, पाहा VIDEO
Shivam Dube : शिवम दुबेने टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतरच्या रेल्वे प्रवासाबद्दल खुलासा केला आहे.

Shivam Dube explain his train journey after T20 World Cup 2026 win : टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर काही तासांतच शिवम दुबे संघ सोडून घराकडे रवाना झाला. जिथे इतर खेळाडू चार्टर्ड फ्लाईट किंवा विमानाने आपल्या शहरात परतत होते, तिथे दुबेने वेगळा मार्ग निवडला. त्याने अहमदाबाद ते मुंबई असा प्रवास ‘सयाजी नगरी एक्सप्रेस’च्या एसी ३-टियर कोचमधून पूर्ण केला. आता शिवम दुबेने हा मार्ग का निवडला? याबाबत खुलासा केला आहे.
कुटुंबाला भेटण्याची ओढ –
शिवम दुबेने या निर्णयामागचे कारण सांगताना स्पष्ट केले की, विश्वचषकाच्या धावपळीनंतर त्याला आपल्या कुटुंबाची खूप आठवण येत होती. मुंबईसाठी तातडीने विमान उपलब्ध नसल्याने त्याने वेळ वाया न घालवता रेल्वेचे तिकीट बुक केले. रस्ते प्रवासापेक्षा रेल्वेने लवकर पोहोचता येईल, असे वाटल्याने त्याने पहाटे ५ वाजताच आपली पत्नी आणि एका मित्रासह रेल्वे प्रवास सुरू केला.
ओळख लपवण्यासाठी खास ‘प्लॅनिंग’
❤️🇮🇳 UNSUNG HERO, REAL HEART!
Shivam Dube didn’t celebrate with the spotlight…
he chose a train journey straight home. 🚆No glamour. No delay.
Just a man eager to hug his family after making the nation proud. 🥹❤️#ShivamDube pic.twitter.com/F5BqrymO4D— ND Sport (@SportsByND) March 18, 2026
विश्वविजेत्या खेळाडूने सर्वसामान्य ट्रेनमधून प्रवास करणे धोक्याचे होते. चाहत्यांची गर्दी टाळण्यासाठी दुबेने जबरदस्त रणनीती आखली होती. त्याने टोपी, फेस मास्क आणि पूर्ण बाह्यांचा टी-शर्ट घालून आपली ओळख पूर्णपणे लपवली होती. विशेष म्हणजे, त्याने आपल्या पत्नीला ताकीद दिली होती की, “ट्रेन सुटण्यापूर्वी केवळ ५ मिनिटे आधी आपण कारमधून उतरून फलाटावर जाऊ”, जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही.
साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने –
कोणताही बडेजाव न मिरवता एका सामान्य प्रवाशाप्रमाणे रेल्वेच्या वरच्या बर्थवर (Upper Berth) झोपून दुबेने हा ८ तासांचा प्रवास पूर्ण केला. भारतीय संघासाठी विश्वचषकात ९ सामन्यांत २३५ धावा कुटणाऱ्या या खेळाडूच्या साधेपणाचे आणि कौटुंबिक प्रेमाचे सध्या सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे.





