Allah Ghazanfar Statement : “भारत आमचा सर्वात जवळचा मित्र…”, काबूलमधील नरसंहारानंतर अफगाण क्रिकेटपटूचं मदतीसाठी भावनिक आवाहन
Allah Ghazanfar statement : युवा फिरकीपटू अल्लाह गझनफरने या घटनेवर शोक व्यक्त करत भारताकडे मदतीचे साकडे घातले आहे.

Allah Ghazanfar statement on Kabul Air Strike : पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल येथील ‘ड्रग रिहॅबिलिटेशन’ (व्यसनमुक्ती केंद्र) रुग्णालयावर केलेल्या भीषण हवाई हल्ल्याने संपूर्ण जग हादरले आहे. या अमानवीय कृत्यात ४०० जणांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या कठीण काळात अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू आपल्या देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून, युवा फिरकीपटू अल्लाह गझनफरने या घटनेवर शोक व्यक्त करत भारताकडे मदतीचे साकडे घातले आहे.
अल्लाह गझनफर काय म्हणाला?
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये सध्या भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. निष्पाप नागरिकांना लक्ष्य केल्यामुळे अफगाण क्रिकेटपटूंनी पाकिस्तानचा तीव्र निषेध केला आहे. मुंबई इंडियन्सचा युवा स्टार फिरकीपटू अल्लाह गझनफरने एका मुलाखतीत आपले दुःख व्यक्त केले. तो म्हणाला, “ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत अशा व्यसनमुक्ती केंद्रातील लोकांना टार्गेट करून शहीद करण्यात आले. हे अफगाणिस्तानला कधीही मान्य होणार नाही,” अशा शब्दांत गझनफरने आपली व्यथा मांडली.
भारताला दिला खास संदेश –
🚨AFGHANISTAN PLAYER SENDS EMOTIONAL MESSAGE TO INDIA.🚨
– Allah Ghazanfar called India a “close friend”, saying they want to stay connected & maintain strong ties after the deadly airstrikes.
His message came after the tragic incident in Kabul 🤯pic.twitter.com/oi6KqKM2L8
— Sam (@Cricsam01) March 18, 2026
या भीषण संकटाच्या काळात गझनफरने भारताचा उल्लेख ‘जवळचा मित्र’ असा केला आहे. तो म्हणाला, “भारत हा आमचा अत्यंत जवळचा मित्र देश आहे. अशा अमानवीय घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आम्ही भारताशी चर्चा करू इच्छितो. जगातील इतर देशांनीही यात लक्ष घालावे, कारण निष्पाप लोकांचा बळी जाणे हे कोणासाठीही योग्य नाही.”
आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सचा शिलेदार –
अवघ्या १८ वर्षांचा हा अफगाण फिरकीपटू आगामी आयपीएल २०२६ मध्ये पाचवेळा विजेत्या ठरलेल्या मुंबई इंडियन्स कडून खेळताना दिसणार आहे. लिलावापूर्वीच मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात कायम ठेवले आहे. गझनफरने आतापर्यंत अफगाणिस्तानसाठी १ कसोटी, १४ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामने खेळले आहेत. मैदानात आपल्या फिरकीने भल्याभल्यांना चकवणारा हा खेळाडू सध्या आपल्या देशावर ओढवलेल्या संकटामुळे प्रचंड अस्वस्थ आहे





