Shivajinagar Assembly Election 2024 | सर्वसामान्य जनता काँग्रेसला साथ देणार – दत्ता बहिरट

पुणे(प्रतिनिधी) :- महागाईने मध्यमवर्गीय व गरीबवर्गाचे कंबरडे मोडले असून, त्याकडे लक्ष न देता, केंद्र व राज्य सरकार जीएसटी व अन्य करांमध्ये वाढ करीत महागाई वाढवतच आहे. केवळ शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनता काॅग्रेसला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला साथ देईल असा विश्वास महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट, आम आदमी पार्टी व मित्रपक्षाचे काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांनी व्यक्त केला.
दीप बंगला चौक येथील त्यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी पक्षाचे निरीक्षक विमल चुडासामा, निरीक्षक जगदीश ठाकुर, अॅड. अंकुश काकडे, दीप्ती चवधरी, अॅड. अभय छाजेड, श्रीकांत पाटील, आनंद मंजाळकर, राजेंद्र भुतडा, उमेश वाघ, राजू साने, तेजिंदरसिंग अहलुवालिया, रफिक शेख, विनोद रणपिसे, राजन नायर, मनीषा ओव्हाळ, ज्योती परदेशी, कल्पना शंभरकर, महेश पवार, रमेश पवळे, सूरज जाधव, रवींद्र कांबऴे (गवई गट), विशाल जाधव, अजित थेरे, गणेश लालबेकी आदींसह महाविकास आघाडीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





